
'लाडक्या बहिणी'च्या अडचणी थांबता थांबेना ! हफ्त्यासाठी महिलांना करावी लागते पायपीट
मुंबई : महायुतीला विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाकडून ही योजना चालवली जात आहे. नियमित लाभ मिळण्यासाठी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन वेळोवेळी करण्यात आले होते. मात्र, काही महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण करूनही अनुदानाचे पैसे अद्याप बँक खात्यात न आल्याने त्यांना या पैशांसाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
खाते केवायसी करण्यासाठी बँकेची तर काहींना गोंदिया येथील महिला व बालविकास कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. यात संबंधित अधिकारी, कर्मचारी देखील नवे-नवे कारण पुढे करून त्या लाभार्थी महिलांना पायपीट करण्यास भाग पाडताना दिसत आहेत. त्यामुळे सरकारविरुद्ध लाभार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, निवडणुकीनंतर अंमलबजावणी होत असलेल्या योजनेत अनेक त्रुटीपूर्ण लाभार्थी असल्याची बाब पुढे करून लाभार्थ्यांचे हप्ते थांबविण्यात आले. खात्यात लाभाचे पैसे जमा होत नसल्याने महिलांमध्ये मोठी धावपळ सुरू झाली आहे. अलीकडे ही योजना बंद पडणार नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात शेकडो, हजारो महिलांची गर्दी दिसून येत आहे. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयाची पायपीट करणे लाडक्या बहिणीला भाग पडत आहे. काही महिलांना दोन महिन्यांचे हप्ते मिळाले नाही. तेव्हा कार्यालयातील कर्मचारी काही महिलांना तुमची केवायसी झाली नसल्याचे सांगतात तर काही महिलांना एका रेशनकार्डवर तीन महिलांचे नाव असले व ते तिन्ही लाभार्थी असतील तर फक्त एकाच महिलेला हप्ता मिळणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची निराशा असल्याचे चित्र आहे.
ई-केवायसी नसल्याने थांबवला हफ्ता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले आहे. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना अनुदानाचा हफ्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे महिलांची निराशा झाली आहे. आता यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा : PMC Elections 2026 : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?