Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडक्या बहिणींना मिळणार दिलासा; e-KYC करताना केलेली चूक येणार सुधारता, आता अंगणवाडी सेविका थेट…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी राज्य राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत दिली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 22, 2026 | 01:21 PM
लाडक्या बहिणींना मिळणार दिलासा; e-KYC करताना केलेली चूक येणार सुधारता, आता अंगणवाडी सेविका थेट...

लाडक्या बहिणींना मिळणार दिलासा; e-KYC करताना केलेली चूक येणार सुधारता, आता अंगणवाडी सेविका थेट...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले आहे. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना अनुदानाचा हफ्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे महिलांची निराशा झाली आहे. आता यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करताना अनेक महिलांनी चुका केल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे. लाभ बंद झाल्याने लाभार्थी महिलांमधून रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ई-केवायसीमधील ही चूक सुधारण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाभ बंद झालेल्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी राज्य राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत दिली होती. परंतु, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतांना अनेक महिलांनी चुका केल्या आहेत.

हेदेखील वाचा : ‘आम्हाला अनुदानाचे थकित हफ्ते मिळणार तरी कधी?’ लाडक्या बहिणींची सरकारला हाक

दरम्यान, ज्या महिलांनी चुका केल्या अशा महिलांची नावे तात्पुरत्या अपात्र यादीत समाविष्ट झाल्याने या महिलांना लाभापासून वंचित राहावे लागले आहे. ज्या महिलांनी मुदतीच्या आत ई-केवायसी पूर्ण केली नाही, अशा महिलांच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमधून शासनाविरोधात रोष व्यक्त केला जात असून, ई-केवायसीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. यावर तोडगा म्हणून योजेनच्या निकषानुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रिय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात असून, या संदर्भात राज्य शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

ई-केवायसी प्रक्रियेने महिलांची वाढवली डोकेदुखी 

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रियेने राज्यभरात महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक महिलांना पैसेच मिळाले नाही. ई-केवायसी करताना त्रुटी राहिल्यामुळे पैसे जमा झाले नसल्याचे समोर आले आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आता ई-केवायसी करताना झालेल्या चुका दुरूस्त करण्याबाबत महिलांना माहिती दिली.

हेदेखील वाचा : PMC Elections 2026 : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?

Web Title: Mistake in the ladki bahin yojana can be corrected through anganwadi workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Karjat News : लाडक्या बहिणींना शासकीय वस्तीगृहात अन्नधान्याची आबाळ, महिला बालविकास विभागाचा अनागोंदी कारभार
1

Karjat News : लाडक्या बहिणींना शासकीय वस्तीगृहात अन्नधान्याची आबाळ, महिला बालविकास विभागाचा अनागोंदी कारभार

…म्हणून थांबला असेल ‘लाडकी बहीण’चा हफ्ता; तुम्ही देखील ‘ही’ चूक केली का?
2

…म्हणून थांबला असेल ‘लाडकी बहीण’चा हफ्ता; तुम्ही देखील ‘ही’ चूक केली का?

‘आम्हाला अनुदानाचे थकित हफ्ते मिळणार तरी कधी?’ लाडक्या बहिणींची सरकारला हाक
3

‘आम्हाला अनुदानाचे थकित हफ्ते मिळणार तरी कधी?’ लाडक्या बहिणींची सरकारला हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.