
सिंधुदुर्ग/ संजय वालावलकर : जागतिक महिला दिनानिमित्त केंद्र शासनाच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय अंतर्गत 8 मार्च रोजी महिला दिनाचं औचित्य सकाळी 7 वाजले पासून 13 ते 18 वयोगटावरील 100 ते 400 मीटर धावणे स्पर्धा सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल येथे ऍथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी युवती आणि महिला सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तरी या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ व माय भारत कार्यक्रम पर्यवेक्षक अपेक्षा मांजरेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले आहे
सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालय पत्रकार कक्षात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने अस्मिता अंतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय अंतर्गत करण्याचे केंद्र सरकारच्या माध्यमातून मेरा युवा भारत सिंधुदुर्गजिल्हा क्रीडा विभाग स्पोर्ट अथलेटिक ऑफ इंडिया याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून 13ते 18 वर्षावरील विद्यार्थी युवती आणि महिलांसाठी महिलांचा क्रीडा क्षेत्रातसहभाग वाढविणे शारीरिक तंत्र दुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करणे आणि ग्रामीण शहरी आणि अर्ध शहरी भागातील मुली व महिलांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे सन 2021 पासून अस्मिता उपक्रमांतर्गत देशभरात हजारो स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे लाखोमहिला खेळाडूंनी यामध्ये सहभाग दर्शविला आहे या माध्यमातून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे देशात 250 जिल्ह्यात या स्पर्धा होत असून महाराष्ट्र राज्यात 13 जिल्ह्यांमध्येसिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असल्याचेही कार्यक्रम पर्यवेक्षक अपेक्षा मांजरेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना श्रीमती अडसूळ म्हणाल्या यावर्षी जिल्हास्तरावर विविध क्रीडा प्रकाराचे स्पर्धांचे आयोजन अथलेटिक या क्रीडा प्रकारांमधून निश्चित केले आहे या 100 मीटर धावणे 200 मीटर धावणे 400 मीटर धावणे अशा तीन प्रकारात 13 ते 18 व 18 वर्षावरील महिलांचा सहभाग आहे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा पासून माध्यमिक उच्च माध्यमिक व विविध संस्थांमध्ये शिकणाऱ्या तसेच एटलाटिक्स स्पर्धचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी यामध्ये आपली अस्मिता पोर्टल द्वारे नोंदणी करावयाची आहे जर या पोर्टलवर नोंदणी न झाल्यास थेट आपले आधार कार्ड जन्मतारीख सह माहिती घेऊन आठ मार्च रोजी सिंधुदुर्ग नगरी जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी सात वाजता उपस्थित राहायचे आहे.
यामध्ये क्रीडा तज्ञ प्रशिक्षक शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या सहकार्याने या स्पर्धेचे नियोजन अंमलबजावणी करण्यात येत आहे महिला सक्षमीकरणाला चालना मिळून फिट इंडिया चा संदेश अधिक व्यापकपणे समाजात पोहोचेलअसा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी युवती आणि महिलांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे तर विजेत्या स्पर्धकांना मेडल दिले जाईल या स्पर्धेसाठी कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी तृप्ती धोडा मिसेस अप्परजिल्हाधिकारी शुभांगी साठेउपजिल्हाधिकारी आरती देसाई यासह विविध महिला अधिकारी उपस्थित राहणार आहेत गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या स्पर्धा केंद्र शासनाच्या माध्यमातून घेतल्या जात होत्या त्यानंतर आता प्रथमच केंद्र सरकार मेरा युवा भारत सिंधुदुर्गच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन केले आहे या उपक्रमात जिल्हा क्रीडा कार्यालय स्काऊट गाईड शिक्षण विभाग औद्योगिक प्रशिक्षण संस्था एनएसएस एनसीसी विविध शाळा महाविद्यालय महिला आर्थिक विकास महामंडळ या विविध संस्थांचा सहभाग आहे तरी सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी मुलींनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोज कांच्या वतीनेकरण्यात आले आहे.’