
Health, Maharashtra Health, Rural Healthcare, Infrastructure, Breaking News,
World Health Day: जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे वास्तव समोर आले असून, प्राथमिक आणि दुय्यम आरोग्य सुविधांमध्ये मोठी तूट असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. राज्यात कोल्हापूर, पुणे, अमरावती, बुलढाणा आणि मुंबई येथे प्रत्येकी एक क्षयरोग रुग्णालय असून, कुष्टरोग रुग्णालय केवळ कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात आहेत, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, नागपूर येथे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रे आहेत. मनोरुग्णालयेही केवळ चार आहेत. पुणे, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये मनोरुग्णालये आहेत.
महाराष्ट्रात आरोग्य विभाग मुख्यतः प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील सेवा पुरवतो. यात उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि प्रथम संदर्भ युनिट्स यांचा समावेश होतो. तर तृतीय स्तरावरील सेवा प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मार्फत चालवल्या जातात. मुंबईसारख्या महानगरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था सार्वजनिक आरोग्य सेवा हाताळतात. महाराष्ट्र राज्य कृती आराखडात ग्रामीण आरोग्य आकडेवारी २०२१-२२ नुसार राज्यात जिल्हा मुख्यालयांवर २३ जिल्हा रुग्णालये आणि ८ सामान्य रुग्णालये असून, या सर्वांची एकत्रित खाट क्षमता ९,५९३ इतकी आहे. मात्र, लोकसंख्येच्या निकषांनुसार आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधांच्या तुलनेत मोठी तूट दिसून येते. तज्ज्ञांच्या मते, वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बदलते आजारांचे स्वरूप लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये तातडीने वाढ करणे आवश्यक आहे.
आरोग्यसंपन्न गाव कसे राहील आणि लोक निरोगी कसे राहतील हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दवाखान्याची गरजच भासू नये, अशा आरोग्यदायी सवयी अंगीकारून समाज निरोगी ठेवणे आवश्यक आहे. काही पातळीवर कमतरता असली तरीही योजनांच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्यावर आमचा भर आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि परिणामकारक होऊ शकते.
– डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक,
ग्रामीण भागात प्रत्येक ३,००० ते ५,००० लोकसंख्येमागे एक उपकेंद्र, २०,००० ते ३०,००० लोकसंख्येमागे एक प्रा. आरोग्य केंद्र आणि ८०,००० ते १.२ लाख लोकसंख्येमागे एक काम्युनिटी हेल्थ सेंटर असणे अपेक्षित आहे. शहरी भागात झोपडपट्टी क्षेत्रात ५०,००० लोकसंख्येमागे एक केंद्र असणे आवश्यक आहे.
राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य संस्थांचे मोठे जाळे विस्तारलेले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी एकूण १०,७८८ उपकेंद्रे आणि १,९५८ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, विविध उपचार पद्धतींनुसार १२१ आयुर्वेदिक दवाखाने, ६६ ॲलोपॅथिक दवाखाने, १३ युनानी दवाखाने, २५ जिल्हा परिषद दवाखाने आणि ४ मुफसल दवाखाने सेवा देत आहेत.
दुर्गम आणि विशिष्ट गरजा असलेल्या भागांसाठी ३७ फिरते आरोग्य पथके, १२ प्राथमिक आरोग्य पथके आणि नागरी दवाखान्यांची सोय करण्यात आली आहे. या सर्व संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळण्यास मदत होत असून, सार्वजनिक आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी ही यंत्रणा अहोरात्र काम करत आहे.
Pune Crime: संशयातून थरकाप! पत्नीची हत्या करून ‘अपघात’ दाखवण्याचा पतीचा डाव फसला; आरोपी अटकेत
ग्रामीण रुग्णालय (३० खाटा): ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीचे उपचार मिळावेत यासाठी राज्यात एकूण ३७४ ग्रामीण रुग्णालये (३० खाटांची क्षमता) अहोरात्र सेवा देत आहेत.
उपजिल्हा रुग्णालये: रुग्णांच्या वाढत्या संख्येनुसार ५० खाटांची ७१ उपजिल्हा रुग्णालये आणि १०० खाटांची ३३ उपजिल्हा रुग्णालये ठिकठिकाणी उभारण्यात आली आहेत.
स्त्री रुग्णालय: महिलांच्या विशेष आरोग्य गरजा आणि प्रसूती सुविधेसाठी राज्यात २३ विशेष स्त्री रुग्णालये कार्यरत आहेत.
नागरी आरोग्य सुविधा: शहरी भागातील प्राथमिक उपचारांसाठी ४ नागरी दवाखाने कार्यान्वित असून, या क्षेत्रातील आरोग्य सुविधांचा निर्देशांक ५३.८% इतका नोंदवण्यात आला आहे.