Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोखाड्यात जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह! शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम

मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे जागतिक आदिवासी दिन शेकडो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत पारंपरिक नृत्य, रॅली आणि घोषणाबाजीसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 10, 2025 | 04:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला. हा दिवस संपूर्ण जगभरात आदिवासी समाजाच्या ओळखीचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. आदिवासी समाजाच्या निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचा, जल-जंगल-जमिनीवरील निष्ठेचा आणि मानवी मूल्यांवरील श्रद्धेचा हा उत्सव खोडाळा परिसरातदेखील अत्यंत उत्कटतेने पार पडला. पारंपरिक पेहराव, वेशभूषा आणि नृत्यांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली.

राज्यातील प्राणिसंग्रहालयांमध्ये 222 हून अधिक प्राण्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

सकाळपासूनच खोडाळा बाजारपेठेतून शेकडो आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन भव्य रॅली काढली. डीजे, संबळ, तुतारी आणि तारपा वाद्यांच्या तालावर पारंपरिक नृत्य करत सहभागी झालेल्या महिला-पुरुषांनी संपूर्ण परिसराला उत्साहाच्या लाटेत रंगवले. “जय आदिवासी, जय जोहार”च्या घोषणांनी खोडाळा गाव दुमदुमून गेले. रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात वीर आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये, माजी आमदार सुनील भुसारा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई झोले, जिल्हा परिषद सदस्य हबीब भाई शेख, मोखाडा नगरपंचायत नगराध्यक्ष अमोल पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक पाटील, भाजपचे मोखाडा तालुकाध्यक्ष मिलींद झोले, खोडाळा सरपंच कविता पाटील, उपसरपंच उमेश येलमामे, माजी सरपंच प्रभाकर पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.

रॅलीनंतर ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात आदर्श व्यक्ती सन्मान सोहळा पार पडला. यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी आणि समाजकार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या भाषणात क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचे मोल अधोरेखित केले आणि आदिवासी समाजाने आपली सांस्कृतिक ओळख व परंपरा जपत शिक्षण, आरोग्य आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याचे आवाहन केले.

पुलाचे कठडे तोडून अवजड ट्रक पुलावरच लटकला; महामार्गावरील वाहतूक ठप्प

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी समन्वय समिती आणि स्थानिक ग्रामपंचायत यांनी केले होते. कार्यक्रमाला आदिवासी बांधव, बहुसंख्य महिला भगिनी आणि युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवातील एकजुटीचा, आनंदाचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा वातावरण सर्वांच्या मनावर अमिट ठसा उमटवून गेला.

Web Title: World tribal day excitement in mokhada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 04:10 PM

Topics:  

  • world tribal day

संबंधित बातम्या

World Tribal Day 2026: ‘ट्रेडिंग रील्स’ ते ‘सांस्कृतिक वारसा’! नव्या पिढीसमोर कशी येतेय आदिवासी लोककला?
1

World Tribal Day 2026: ‘ट्रेडिंग रील्स’ ते ‘सांस्कृतिक वारसा’! नव्या पिढीसमोर कशी येतेय आदिवासी लोककला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.