राज्यातील प्राणिसंग्रहालयांमध्ये 222 हून अधिक प्राण्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर (Photo : iStock)
मुंबई : निसर्ग आणि प्राणी यांचे अतूट नाते असून, एकमेकांना पूरक आहेत. निसर्गाचे संतुलन ठेवण्यासाठी प्राण्यांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे; पण त्यावर नियंत्रणही निसर्गच ठेवतो. प्राणी म्हटल्यावर मग त्यामध्ये माणूस देखील आला; पण माणूस व इतर प्राणी प्रगतशील प्राणी आहे. त्यामुळे प्राणी म्हणजे साधारणपणे इतर प्राणी असे समजले जाते.
राज्यातील प्राणी संग्रहालयांत मागील सन (२०२४-२५ यांच्यामध्ये मोठा फरक असून माणूस हा) या आर्थिक वर्षाच्या कालावधीत २२२ वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे. यात वाघ, बिबटे, अस्वल, हरिण यासह विविध प्रकारचे पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे. सेंट्रल झू अथॉरिटीच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. या वन्यजीवांचा मृत्यू कशाने झाला, याची कारणे अहवालात नाहीत. राज्यात तीन रेस्क्यू सेंटर, १ शेल्टर हाऊस, १ स्नेकपार्क, तर ८ प्राणिसंग्रहालये आहेत.
देशभरातील प्राणिसंग्रहालयांमध्ये ३९ वाघांचा मृत्यू झाला आहे. पट्टेदार वाघासह पांढऱ्या वाघांचा यात समावेश आहे. टायगर अॅण्ड लायन सफारी आणि रेस्क्यू सेंटरमध्ये प्रत्येकी १ वाघाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील प्राणिसंग्रहालयांमध्ये मागील वर्षात ११२ वन्यजीवांचा जन्म झालेला आहे. पुणे येथील राजीव गांधी झूलॉजिकल पार्क मध्ये सर्वाधिक म्हणजे ४७वन्यजीवांचा जन्म झालेला आहे. त्याखालोखाल मुंबई येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचा क्रमांक मुंबई येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयामध्ये (राणीची बाग) राज्यात सर्वांत जास्त प्राण्यांचे मृत्यू झाले आहेत.
प्राणी घाबरल्यामुळे त्यांना शॉक बसतो अन् मृत्यू
मी गेल्या 25 वर्षांपासून वन्यजीव क्षेत्रात काम करत आहे. आता निवृत्त झालो आहे. आत्तापर्यंतच्या माझ्या निरीक्षणांत प्राणिसंग्रहालयांमध्ये प्राण्यांचे आयुर्मान वाढते. कारण, प्राणिसंग्रहालयांत प्राण्यांची देखरेख करण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ असते. शिवाय, डॉक्टर देखील असतात. प्राणिसंग्रहालयांत तृणभक्षक प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आढळते. कारण, हे प्राणी खूपच संवेदनशील असतात. घाबरल्यामुळे त्यांना शॉक बसतो अन् त्यांचा मृत्यू होतो. याशिवाय संसर्गजन्य आजारही या प्राण्यांना झाले तर तो तत्काळ समजणे आणि त्यांच्यावर तत्काळ उपचार करणेही अवघड असते.
– अनिल अंजनकर, निवृत्त वनसंरक्षक, भारतीय वनसेवा (आयएफएस)