मुंबई : राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका (State Aganwadi sevika) मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस (mini Aganwadi sevika and helepers) यांना पेन्शन (Pension) योजना व मानधन वाढ करण्यासंदर्भात शासन (State government) सकारात्मक असून, याबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. (Child and women minister yashomati thakur) अंगणवाडी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळासोबत महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक (meeting) संपन्न झाली. या बैठकीत अंगणवाडी कर्मचा-यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.
[read_also content=”शिक्षणमंत्री वर्षा गायकवड यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन, आणि पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा https://www.navarashtra.com/maharashtra/congratulations-to-the-students-from-education-minister-varsha-gaikwad-and-best-wishes-for-the-future-293660.html”]
दरम्यान, मंत्री ठाकूर म्हणाल्या की, इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अंगणवाडी संख्या जास्त आहे. आपण दरवर्षी अंगणवाडी कर्मचा-यांना भाऊबीज भेट देतो. कोव्हिड काळात मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांच्या कुटुंबियांना 50 लाख रूपयाचे सानुग्रह अनूदान दिले. महिला व बालविकास विभाग अंगणवाडी कर्मचा-यांच्या नेहमीच पाठीशी असतो. अंगणवाडी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना सबंधिताना मंत्री ठाकूर यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रूबल अग्रवाल, उपसचिव वि. रा. ठाकूर, एकात्मिक बाल विकास उपायुक्त गोकुळ देवरे, उपायुक्त विजय क्षीरसागर, अंगणवाडी कर्मचारी समितीचे एम. ए. पाटील, राजेश सिंह, निशा शिवूरकर, विजया सांगळे, अनिता कुलकर्णी, अरूणा अलोणे, माया पवार, चंदा लिगरवार, हुकुमताई ठमके उपस्थित होते.