
Yevla Municipal Council Election Result Chhagan Bhujbal NCP candidate Rajendra Lonari wins nashik
येवला हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्रा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येवला नगर परिषदेमध्ये छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. नाशिकमधील सहा नगर परिषदांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यामध्ये येवला, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, भगूर, इगतपुरी आणि मनमाड या नगर परिषदांचा समावेश आहे. यामधील येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार गटाला विजय मिळवून दिला आहे. येवल्यामध्ये राष्ट्रवादी भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र लोणारी हे विजयी झाले आहेत. लोणारी हे 1100 मतांनी विजयी झाले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रुपेश दराडे यांचा पराभव करण्यात आला. यामुळे येवल्यामध्ये महायुतीमध्ये झालेल्या लढतीमध्ये भाजप-राष्ट्रवादीच्या युतीने बाजी मारली आहे.
हे देखील वाचा : बीडमध्ये मुंडे गढ राखणार की सोनावणे बाजी मारणार? मुंडे भावा-बहिणीची प्रतिष्ठा पणाला
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या उपचार होते. रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या भुजबळ यांनी रुग्णालयातून सर्व कारभार हाती घेतला. रुग्णालयामध्ये दाखल असताना त्यांनी सर्व प्रचार आणि राजकीय नीती ठरवली होती. छगन भुजबळ हे आजारी असल्यामुळे ते प्रत्यक्ष प्रचारामध्ये उतरु शकले नाहीत. मात्र रुग्णालयातून मार्गदर्शन करुन त्यांनी आपली कुटनीती दाखवून दिली आहे. मंत्री भुजबळ आजारी असल्यामुळे प्रचाराची धुरा समीर भुजबळ यांनी समर्थपणे सांभाळली. संपूर्ण भुजबळ कुटुंबाने मोठ्या उत्साहाने निवडणुकीचा प्रचार केला. यानंतर छगन भुजबळ यांनी रुग्णलायातून प्रचार करुन विजयश्री खेचून आणला.
हे देखील वाचा : सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता…! भाजपवर किशोरी पेडणेकरांचा संताप, पैशांचे वाटप केल्याचा आरोप
येवल्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला होता. येवल्यामध्ये महायुतीमध्ये मैत्रिपूर्ण लढत झाली. भुजबळ कुटुंबाने विजय मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. छगन भुजबळ यांनी रुग्णालयातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला होता. भुजबळ यांना भाजपचा पाठिंबा मिळाल्यानंतर त्यांना आणखी बळ मिळाले. तर शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे यांनी भुजबळांना शह देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. अगदी त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ देखील मिळाली. मात्र तरीही भुजबळांनी येवल्यामध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे.