Death
रावेर : शहरातील श्रीराम पेट्रोलियम येथील पेट्रोल पंपावर स्टिलच्या आरओ मशीनवर थंड पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका 28 वर्षीय तरुणाचा शॉक लागून (Youth Died due to Electric Shock) मृत्यू झाला. ही घटना रावेर शहरात घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
धृव कुशवाह (रा. सुजातपूर.जि. भिंड) असे यामध्ये मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. धृव हा रावेर शहरातील अनेक वर्षांपासून श्रीराम पेट्रोलियम समोर गाडी लावून पाणीपुरी विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होता. श्रीराम पेट्रोलियम येथे थंड पाणी देणाऱ्या आरओ मशीनवर पाणी पिण्यासाठी गेला होता. या मशीनला हात लावताच धृव याला विजेचा तीव्र धक्का लागला. त्यामुळे तो क्षणातच खाली कोसळला.
दरम्यान, यानंतर नागरिकांची गर्दी जमा झाली आणि धृव कुशवाह याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीचा त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. धृव याची घरची स्थिती अत्यंत हालाखीची असून, त्याला आई-वडील व गर्भवती पत्नी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.