Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरबा खेळताना मुलुंडमध्ये तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 03, 2022 | 08:31 AM
गरबा खेळताना मुलुंडमध्ये तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी नवरात्रोत्सवात सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र या उत्साहाच्या भरात गरबा खेळताना मुलुंड मध्ये एक दुर्दैवी घटना घडली. मुलुंडमधील कालिदास नाट्यगृह इथे भाजपतर्फे (BJP) आयोजित प्रेरणा रासमध्ये गरबा खेळत असताना शनिवारी १ ऑक्टोबर रोजी रात्री एका तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

मृत तरुणाचे नाव ऋषभ लहरी मंगे भानुशाली असं असून तो अवघा २७ वर्षांचा होता. डोंबिवलीचा रहिवासी असणाऱ्या ऋषभने एमबीएचे शिक्षण घेतले होते. बोरिवलीतील एका खासगी कंपनीत ऋषभ नोकरी करीत होता. डोंबिवली पश्चिममध्ये तो आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. घरातला एकटा कमवणारा तरुण मुलगा गेल्याने त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

नवरात्रोत्सवात इतरांप्रमाणे तो देखील कुटुंबियांसोबत मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात भाजप नेते मनोज कोटक आयोजित गरबा खेळण्यासाठी आला होता. परंतु गरबा खेळत असतानाच त्याच्या छातीत दुखू लागले. अॅसिडिटी झाल्याचं समजून कुटुंबियांनी त्याला थंड पेय पिण्यास दिले. परंतु तरीही वेदना काही कमी न झाल्याने उपस्थितांच्या मदतीने त्याला तातडीने मुलुंडच्या आदिती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केलं. ऋषभच्या मृत्यूनंतर तरुणांमधील हृदविकाराच्या झटक्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहेत.

Web Title: Youth in mulund dies of heart attack while playing garba

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2022 | 08:31 AM

Topics:  

  • HeartAttack
  • Mumbai

संबंधित बातम्या

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
1

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
2

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
3

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.