Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑनलाईन गेमच्या विळख्यात अडकली वाईतील तरुणाई; लाखो रुपयांची केली जातीये उधळपट्टी

वाई शहर आणि परिसरात ऑनलाईन गेमिंगचे व्यसन वेगाने पसरत आहे. कॉलेजचे तरुण-तरुणी, विशेषतः ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी, शहरातील झगमगाटाला भुलून या व्यसनाच्या आहारी जात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 29, 2025 | 12:03 PM
ऑनलाईन गेमच्या विळख्यात अडकली वाईतील तरुणाई; लाखो रुपयांची केली जातीये उधळपट्टी

ऑनलाईन गेमच्या विळख्यात अडकली वाईतील तरुणाई; लाखो रुपयांची केली जातीये उधळपट्टी

Follow Us
Follow Us:

वाई : सुसंस्कृत आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. शहरातील तरुण पिढी ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या विळख्यात अडकून बरबाद होत असून, लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या खेळात पैसे गमावल्याच्या नैराश्येतून काही तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वाई शहर आणि परिसरात ऑनलाईन गेमिंगचे व्यसन वेगाने पसरत आहे. कॉलेजचे तरुण-तरुणी, विशेषतः ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी, शहरातील झगमगाटाला भुलून या व्यसनाच्या आहारी जात आहेत. पान टपऱ्या आणि कॅफेमध्ये सहज उपलब्ध असलेल्या या ऑनलाईन जुगारावर तरुण लाखो रुपये उधळत आहेत. पैसे गमावल्याने अनेकजण कर्जबाजारी होत असून, व्यसनाधीनतेच्या मार्गाला लागले आहेत.

एकीकडे ऑनलाईन जुगाराने थैमान घातले असताना, दुसरीकडे शहरात पारंपरिक जुगाराचे अड्डेही राजरोसपणे सुरू आहेत. वाई पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हे अड्डे चालत असले, तरी पोलीस त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

दरम्यान, पोलिस केवळ शहराबाहेरील अड्ड्यांवर कारवाई करून आपली पाठ थोपटून घेत आहेत. या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास तरुण पिढीचे भविष्य अंधारात जाईल, अशी भीती व्यक्त होत असून, पोलिसांनी यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

ऑनलाईन गेम्समध्ये उडवले दीड कोटी

याचाच एक धक्कादायक प्रकार तालुक्यातील एका गावात घडला. एका युवकाने ऑनलाईन गेममध्ये पैसे गमावल्याच्या नैराश्येतून आत्महत्येचा प्रयत्न केला. या युवकाने ऑनलाईन गेमवर तब्बल दीड कोटी रूपये उडवले आहेत. यातूनच त्याच्यावर लाखोंचे कर्ज झाल्याने त्याने हे पाऊल उचलले. तो आजही मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे तरूण पिढीने ऑनलाईन गेम्सच्या फंदात पडू नये, असे आवाहन केले जात आहे.

Web Title: Youth in wai trapped in online game addiction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • crime news
  • online games

संबंधित बातम्या

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
1

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
2

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
3

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
4

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.