Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

खर्डा येथील जातेगाव फाट्‌याजवळ शुक्रवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 12, 2026 | 03:41 PM
जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

Follow Us
Follow Us:
  • दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर कोयत्याने वार
  • जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार
  • भरदिवसा घडलेल्या खुनामुळे परिसरात खळबळ
जामखेड : खर्डा येथील जातेगाव फाट्‌याजवळ शुक्रवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. भरदिवसा घडलेल्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तानाजी भास्कर बोराटे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

 

बोराटे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या पिकअपवर (एमएच १२ केपी ५६२६) चालक होते. ते रोज संकलित दूध घेऊन खर्डा येथे येत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे दूध घेऊन आले होते. काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतल्याची माहिती आहे. जातेगाव फाट्याजवळ बोराटे आणि संशयितांत काही कारणावरून वाद झाल्याचे समोर आली आहे. बोराटे यांना मारहाण करताना एकाने त्यांच्या मानेवर कोयत्याने वार केल्याने बोराटे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांनी पथके तयार करून शोधार्थ रवाना केले आहेत.

कारण अद्याप गुलदस्त्यात

भरदिवसा झालेल्या या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य किंवा अन्य कारणातून हा हल्ला झाला आहे का, या दृष्टीने तपास सुरू आहे. या घटनेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटना खर्डा येथे घडली असली तरी खून झालेली व्यक्ती शेजारच्या भूम तालुक्यातील असून ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली, याचा तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी

चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या

चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केवळ ७०० रुपयांवरून तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. राहुल राजेंद्र जंवजाळ (वय २२, रा. चंद्रकला निवास, बोराटे वस्ती, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आशिष डेव्हीड मगर (वय २७, रा. सुभाषनगर, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सहायक निरीक्षक गणेश जगदाळे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हे सुद्धा वाचा : संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

Web Title: An incident involving the murder of a milk transport driver has occurred

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
1

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
2

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

बिहारमध्ये एकाच फासावर लटकलेले आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह; भोला अन् सफीनाच्या मृत्यूचे गूढ गुलदस्त्यात
3

बिहारमध्ये एकाच फासावर लटकलेले आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह; भोला अन् सफीनाच्या मृत्यूचे गूढ गुलदस्त्यात

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई
4

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.