सध्या हिंदी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित वेबसिरिज बनत आहेत. सस्पेस , थ्रिलर, कॅामेडी असे अनेक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला आवडतात.असाच एक नवा कोरा कोर्टरुम ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कॅामेडीचा तडका असलेल्या ‘मामला लीगल है’ (Maamla Legal Hai) सिरिजमध्ये रवी किशन, निधी बिश्त, अनंत व्ही जोशी, नायला ग्रेवाल, अंजुम बत्रा, विजय राजोरिया, यशपाल शर्मा यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. शुक्रवारी, निर्मात्यांनी सिरिजचा ट्रेलर रिलीज केला.
[read_also content=”तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्तींनी दिला राजीनामा, म्हणाल्या – ‘मी जथं आनंदी नाही तिथं राहणार नाही’ https://www.navarashtra.com/movies/mimi-chakraborty-resign-from-post-of-tmc-mp-nrps-507673.html”]
चित्रपटात रवी किशन आणि यशपाल शर्मा वकिलांच्या भूमिकेत आहेत, ज्यांचे डायलॉग डिलिव्हरी आणि कॉमिक टाइमिंग दृश्य सिरिजला मजेशीर बनवते. ट्रेलरमध्ये एक जबरदस्त कोर्टरूम पंच लाइन सादर करण्यात आली आहे. राहुल पांडे यांनी या सिरिजचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट 1 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
या सिरिजचा ट्रेलर पटपरगंज जिल्हा न्यायालय दाखवतो, जिथे अभिनेता रवी किशन व्हीडी त्यागीच्या भूमिकेत हुशार वकिलाची भूमिका करतो. त्याच्यासोबत हार्वर्ड एलएलएमची माजी विद्यार्थिनी अनन्या श्रॉफ देखील सामील झाली आहे, जी या सिरिजमध्ये नायला ग्रेवालची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये सुजाता नेगी देखील दिसत आहे, तिने निधी बिश्तची भूमिका साकारली आहे. तिने अद्याप एकही केस लढलेली नसली तरी तिला स्वत:साठी एसी ऑफिस हवे आहे. याशिवाय अनंत व्ही जोशी कोर्ट मॅनेजर विश्वास पांडेच्या भूमिकेत दिसत आहेत.
सिरिजबद्दल बोलताना अभिनेता रवी किशन म्हणाला, ‘मी पहिल्यांदाच वकिलाची भूमिका साकारली आहे आणि किती मजा आली हे सांगता येणार नाही. समीर, राहुल आणि सौरभ यांच्यासोबत काम करणं खूप छान होतं, जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा कथा सांगितली तेव्हा मी नाही म्हणू शकलो नाही कारण मी या पात्रांची कल्पना करू शकत होतो. ‘खाकी’ नंतर नेटफ्लिक्ससोबतचा हा माझा दुसरा प्रोजेक्ट आहे. दोन वेगवेगळ्या भूमिका असलेल्या अभिनेत्याला ते आव्हान देतात हे मला आवडते. मला आशा आहे की प्रेक्षकांना सिरिज पाहण्यात जितका आनंद वाटतो तितकाच आम्हाला तो बनवताना वाटतो.