विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) दिग्दर्शित विक्रांत मेसी (Vikrant Massey )आणि मेधा शंकर ( medha shank) यांची मुख्य भूमिका असलेल्या ’12वी फेल’ (12th Fail ) या चित्रपटाला प्रेक्षकांसह समिक्षकांचीही पंसती मिळाली. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या बायोपिकने आतापर्यंत अनेक चित्रपटांवर आपलं नाव कोरलं. आता या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या चित्रपटाने 9व्या टूलूस चित्रपट महोत्सवात (Toulouse Film Festival 2024) सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार (Best Film) जिंकला.
[read_also content=”सलमान खानच्या घराबाहेरी गोळीबार प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश, तापी नदीतून एक बंदूक केली जप्त! https://www.navarashtra.com/movies/salman-khan-house-firing-case-crime-branch-recovered-a-gun-and-some-live-cartridges-deets-from-tapi-river-nrps-526406.html”]
’12वी फेल’ या चित्रपटाला टूलूस फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या टीमने ही माहिती दिली. टीमने इंस्टाग्रामवर पोस्ट केलं की, ’12वी फेलला टूलूस फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय चित्रपट श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब देण्यात आला आहे. या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार.
चित्रपटाचे सहनिर्माते योगेश ईश्वर धाबुवाला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यादरम्यान, ते म्हणाला की ’12वी फेल’ हा एक प्रामाणिक चित्रपट आहे, जो सर्व योग्य हेतू आणि भावनांनी बनलेला आहे, कारण प्रेक्षक त्यांच्यासोबत एक अर्थपूर्ण संदेश घरी घेऊन जातात. चित्रपटाने नुकतेच थिएटरमध्ये 25 आठवडे पूर्ण केले आहेत आणि आता तो चीनमध्येही रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.
विधू विनोद चोप्रा यांचा हा चित्रपट अनुराग पाठक यांनी लिहिलेल्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे, ज्यामध्ये भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची अत्यंत गरिबीतून IPS अधिकारी बनण्याची सत्यकथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात मनोज शर्मा यांचा संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील आयआरएस अधिकारी पत्नी श्रद्धा जोशी यांचे महत्त्व दाखवण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या हिट चित्रपटांपैकी एक असलेल्या 12वी फेलने जवळपास 60 कोटींची कमाई केली होती. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही भरभरून दाद दिली आहे. त्याच वेळी, सिने जगतातील दिग्गजांनी त्याचे भरपूर कौतुक केले होते. याला IMDb वर 9.2 रेटिंग देखील मिळाले आहे.