Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२५ वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित होतोय अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचा ‘धडकन’; कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट?

सध्या बॉलिवूडमध्ये जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू आहे. अभिनेता सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांची प्रमुख भूमिका असलेला 'धड़कन' पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 14, 2025 | 05:16 PM
२५ वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित होतोय अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचा 'धडकन'; कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट?

२५ वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित होतोय अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचा 'धडकन'; कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट?

Follow Us
Close
Follow Us:

सध्या बॉलिवूडमध्ये जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू आहे. अभिनेता सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘धड़कन’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडचा आयकॉनिक चित्रपट म्हणून चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलेला पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.

चित्रपट पुन्हा रिलीज होणार आहे, पण प्रेक्षकांना हा चित्रपट डिजिटली रिमास्टर आवृत्तीत पाहायला मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया अक्षय आणि शिल्पाचा हा चित्रपट कधी आणि कसा पाहायला मिळणार आहे…

‘सितारे जमीन पर’ला का केलं जातंय बॉयकॉट, नेमकं कारण काय ?

२००० साली प्रदर्शित झालेला ‘धड़कन’ हा त्या काळातील एक सुपरहिट चित्रपट होता, ज्याने प्रेम, त्याग आणि कुटुंब यांचे संमिश्रण असलेल्या कथेने प्रेक्षकांना प्रभावित केले. आता हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. डिजिटली रिमास्टर असलेल्या या आवृत्तीमुळे प्रेक्षकांना तो पुन्हा मोठ्या पडद्यावर पिक्चर क्वालिटी आणि साऊंड क्वालिटीमध्ये पाहता येणार आहे. या बातमीमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

‘आमचे नाते तसेच आहे…’, अरमान मलिक पहिल्यांदाच भाऊ अमालबद्दल झाला व्यक्त, चाहत्यांना दिली गुड न्यूज

‘धडकन’ हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टीने ‘अंजली’ची भूमिका साकारलीये. तर, सुनील शेट्टीने तिचा प्रियकर ‘देव’ची भूमिका साकारली होती. तर, अक्षय कुमारने शिल्पाचा पती ‘राम’ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात किरण कुमार, कादर खान आणि परमित सेठी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. परमितची खलनायकाची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केले होते.

विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्याने याविषयी पुन्हा एकदा विचार करावा…”

चित्रपटाची स्टारकास्ट आणि कथेव्यतिरिक्त गाण्यांनाही खूप पसंती मिळाली होती. चित्रपटातील सर्वच गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर कायम आहेत. नदीम-श्रवण यांचे संगीत आणि समीर यांच्या गीतांनी चित्रपटाला एव्हरग्रीन बनवले. हा चित्रपट प्रदर्शित होताच ब्लॉकबस्टर ठरला आणि कालांतराने त्याला लोकप्रियता मिळाली. २५ वर्षांनंतर ‘धडकन’चे पुनरागमन जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. चाहते नवीन प्रेक्षकांबरोबर पुन्हा एकदा त्या गोड आठवणींच्या दुनियेत रमण्यास उत्सुक आहेत. ११ ऑगस्ट २००० रोजी हा चित्रपट पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता.

Web Title: 2000 blockbuster film dhadkan re release in theater akshay kumar shilpa shetty romance sunil shetty movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • Bollywood Film
  • Bollywood News
  • Shilpa Shetty

संबंधित बातम्या

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो
1

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
2

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
3

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
4

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.