Sitaare Zameen Par Trailer Twitter Review Netizens Starts Boycott To Movie Says Aamir Khan Accent Is Like Pk
आमिर खान स्टारर ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आहे. नुकताच या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला असून चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एकीकडे अनेक सेलिब्रिटी चित्रपटाचे कौतुक करत असताना नेटकरी सोशल मीडियावर चित्रपटाला ट्रोल करताना दिसत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जातेय. सध्या एक्सवर ‘बॉयकॉट सितारे जमीन पर’ हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.
२००७ साली रिलीज झालेल्या ‘तारे जमिन पर’चा हा सिक्वेल आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचे अनेक बॉलिवूडसह टॉलिवूड सेलिब्रिटींकडून कौतुक केले जात आहे. आमिर खानच्या ‘सितारे जमिन पर’ चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असताना बहिष्कार टाकण्याचीही मागणी केली जात आहे. नेमकं चित्रपटाला एक्सवर का ट्रोल केलं जात आहे ? चित्रपटावर का बहिष्कार टाकला जातोय ? जाणून घेऊया…
Cannes Film Festival 2025 मध्ये दिसणार ‘हे’ पाच भारतीय चित्रपट, यादीत कोणकोणत्या चित्रपटाचा समावेश!
मंगळवारी (१३ मे) संध्याकाळी ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. अवघ्या काही तासांतच ट्रेलरला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हजारो व्ह्यूज देखील मिळालेले आहेत. चित्रपटाबद्दल सकारात्मक बाजू म्हणजे, चित्रपटामध्ये सर्व खऱ्या स्पेशल मुलांना कास्ट करण्यात आले आहेत. कोणीही डाऊन सिंड्रोम किंवा ऑटिस्टिकची ॲक्टिंग केलेली नाही. त्यामुळे चित्रपटाचे कौतुक केले जातेय. दिव्यांग मुलांना आमिर खान बास्केटबॉलचे प्रशिक्षण देताना दिसत आहे. अभिनेता बास्केटबॉलच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. त्यावरच संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
चित्रपटावर एक्सवर का बहिष्कार टाकला जातोय ?
सध्या एक्सवर ‘बॉयकॉट सितारे जमीन पर’ हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जातेय. आमिर खानच्या या चित्रपटादरम्यान त्याचा २०२० मधील काही फोटोज् व्हायरल होत आहेत. त्या व्हायरल फोटोंमध्ये, तुर्कीच्या पहिल्या एमीन एर्दोगान यांच्याबरोबर घेतलेल्या आमिर खानच्या भेटीचे फोटो आहेत. हे फोटो अनेक ट्रोलर्सने शेअर केले आहेत. २०२० साली तुर्कीमध्ये आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’च्या शुटिंगसाठी गेला होता. त्यावेळीही तुर्की आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते, म्हणून आमिर खानला टीकांचा सामना करावा लागला. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. या संबंधांमध्येही तुर्कीने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला आहे.
Remember when Aamir Khan had gone to Turkey & Met the Turkish First Lady?? So Now you know what has to be done with his latest movie Sitare Zameen Par#SitareZameenPartrailer #BoycottTurkey #BoycottSitaareZameenPar pic.twitter.com/qcnLWyaaAk
— Rosy (@rose_k01) May 13, 2025
We are appreciating #BycottTurkey #BycottAzarbaijan now it’s time for#BoycottSitaareZameenPar #SitaareZameenPar because Bollywood has no time for India and can’t hurt their Pakistani fans. No sympathy for these B@st@rds. No support to actor/ actress or any movies. pic.twitter.com/qVIO7QP1lF
— Roushan Singh (@Roushan_Dataguy) May 13, 2025
Amazon Prime Video आणखी महागणार, जाहिरातीच्या नावाखाली किंमत वाढवून चाहत्यांची फसवणूक!
एका युजरने चित्रपटाच्या पोस्टवर क्रॉस मार्क टाकला आणि कॅप्शन दिले की, ” ‘सितारे जमीन पर’वर बहिष्कार घाला कारण बॉलिवूडकडे भारतासाठी वेळ नाही.’ तर आणखी एका युजरने ‘चॅम्पियन्स’ या हॉलिवूड चित्रपटातील अनेक सीन्स कॉपी केल्याचा आरोप केला आहे. तर निर्मात्यांनी आधीच सांगितले आहे की हा चित्रपट रिमेक आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘सर्वप्रथम देश, ‘सितारे जमिन पर’ आणि बॉलिवूडवर बहिष्कार’. एका व्यक्तीने ट्रेलरवर टीकाही केली. त्याने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘चित्रपटाचा ट्रेलर खूप निराशाजनक आहे. त्यामुळे कोणत्याही भावना जागृत झाल्या नाहीत किंवा उत्साह निर्माण झाला नाही. रिमेक चित्रपट पूर्णपणे आपत्तीजनक आहे. आमिर खान अजूनही त्या पीके टोनमध्ये अडकला आहे.’
दो साल पुराना हॉलीवुड सिनेमा ही हिन्दी में बना दिया ! ओटीटी के जमाने में इन्हे क्यों लगता है कि भारत के दर्शक ने कुछ देखा नहीं है?#SitaareZameenPar pic.twitter.com/1PiTJcpQc8
— Mukesh Mathur (@mukesh1275) May 13, 2025
Nation first.
Boycott #SitaareZameenPar & Bollywood.#BoycottBollywood #SitaareZameenPar #radiation #CeasefireNow #pzchat pic.twitter.com/keuyWLnyxi
— शक्ती ♡ (@_iamshakti) May 13, 2025