Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

A.P.J. Abdul Kalam Biopic: ‘मिसाईल मॅन’ची संघर्षयात्रा रुपेरी पडद्यावर येणार, एपीजे अब्दुल कलामांच्या बायोपिकची घोषणा

देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची अवघ्या देशात मिसाईल मॅन म्हणून ओळख आहे. याच मिसाईल मॅनच्या जीवनावर आधारित लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवीन चित्रपट येतोय.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 12, 2025 | 07:22 PM
A.P.J. Abdul Kalam Biopic: 'मिसाईल मॅन'ची संघर्षयात्रा रुपेरी पडद्यावर येणार, एपीजे अब्दुल कलामांच्या बायोपिकची घोषणा

A.P.J. Abdul Kalam Biopic: 'मिसाईल मॅन'ची संघर्षयात्रा रुपेरी पडद्यावर येणार, एपीजे अब्दुल कलामांच्या बायोपिकची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची अवघ्या देशात मिसाईल मॅन म्हणून ओळख आहे. याच मिसाईल मॅनच्या जीवनावर आधारित लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवीन चित्रपट येतोय. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं संपूर्ण नाव, अबुल पाकिर जैनुला अब्दुल कलाम असं आहे. अशा महान विचारवंताचे, लेखकाचे, शास्त्रज्ञाचे आणि राष्ट्रपतींचे जीवन आता प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. निर्माता अभिषेक अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित बायोपिकचा नवीन पोस्टर प्रदर्शित केला आहे. अद्याप अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी हा बायोपीक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेल्दी कसे राहावे? ‘पारू’ने दिला सल्ला; नक्की वाचा

अद्याप चित्रपटाच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. या चित्रपटातून प्रेक्षकांना डॉ. कलाम यांची असाधारण जीवनयात्रा मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. चित्रपटामध्ये प्रेक्षकांना रामेश्वरम, तमिळनाडू येथून राष्ट्रपती भवनापर्यंत, भारताचे ११वे राष्ट्रपती बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास पाहता येणार आहे. अभिषेक अग्रवाल आणि ए.के. एंटरटेनमेंट्स निर्मित हा चित्रपट ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या घनिष्ठ सहकार्याने तयार केला जात आहे, जेणेकरून भारताच्या या प्रिय आणि सन्माननीय व्यक्तिमत्वाचे चित्रण प्रामाणिकपणे आणि सन्मानाने करता येईल.

 

हल्ला झाल्यानंतर करीना कपूर सैफ अली खानला काय म्हणाली ? चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

२०२५ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामध्ये ‘जनतेचे राष्ट्रपती’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. कलाम यांची शिकवण, त्यांची विनम्रता आणि देशसेवेची भावना – हे सर्व हृदयाला स्पर्श करणाऱ्या आणि आत्म्याशी जोडणाऱ्या पद्धतीने दाखवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रदर्शित करण्यात आलेले नवीन पोस्टर या प्रेरणादायी कथानकाच्या आत्म्याची झलक देते — डॉ. कलाम यांच्या चिकाटीला, नवकल्पनांना आणि देशभक्तीच्या भावनेला समर्पित एक दृश्यात्मक श्रद्धांजली आहे.

Web Title: A p j abdul kalam biopic makers unveil new poster on producer abhishek agarwals birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 07:18 PM

Topics:  

  • apj abdul kalam
  • Bollywood
  • bollywood movies

संबंधित बातम्या

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’  कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…
1

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’ कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य
2

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य

‘धुरंधर’ चित्रपटावर IB मंत्रालयाची कात्री, २७ दिवसांनंतर २ सीन कट; आता पुन्हा नव्या आवृत्तीत होणार प्रदर्शित
3

‘धुरंधर’ चित्रपटावर IB मंत्रालयाची कात्री, २७ दिवसांनंतर २ सीन कट; आता पुन्हा नव्या आवृत्तीत होणार प्रदर्शित

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार
4

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.