‘लापता लेडीज’ ‘या’ विदेशी चित्रपटाची कॉपी, किरण राववर कथा चोरल्याचा आरोप
मार्च २०२४ मध्ये रिलीज झालेल्या ‘लापता लेडीज’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केलेली आहे. फार कमी बजेटमध्ये बनवलेल्या ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमावला आहे. जगभरात कौतुकाचा वर्षाव करण्यात आलेल्या चित्रपटाला आणि त्यातील कलाकारांना बऱ्याच पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. सर्वच स्तरातून चित्रपटाच्या कथानकाचे कौतुक होत असताना किरण राववर ‘लापता लेडीज’चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका विदेशी चित्रपटाची कॉपी असल्याचं म्हटलं जातं आहे. या आरोपानंतर नेटकरी किरण रावला तुफान ट्रोल करतायत.
‘लापता लेडीज’ चित्रपटाला ‘आयफा पुरस्कार २०२५’ मध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये तब्बल १० पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवाय, चित्रपटाला ९७व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात पाठवण्यात आले होते. किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपटाला इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न या पुरस्कार सोहळ्यातही काही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘बुर्खा सिटी’ नावाच्या विदेशी चित्रपटाची कॉपी किरण रावने केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झालेला असून चित्रपटातील दृश्य अगदी मिळते जुळते असल्यामुळे हा आरोप करण्यात आला आहे.
Is Laapata Ladies was also Copied? pic.twitter.com/pRUWUqaQNw
— theboysthing (@theboysthing07) March 31, 2025
सोशल मीडियावर सध्या काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये ‘लापता लेडीज’ची दिग्दर्शक किरण राव हिच्यावर कथा चोरल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तेव्हापासून किरण रावचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान, ‘रेडिट’च्या पोस्टमुळे हा वाद निर्माण झाला आहे. ‘रेडिट’वर असा दावा करण्यात येत आहे की, ‘लापता लेडीज’ चित्रपटाची कथा मुळ नाही. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘बुर्खा सिटी’नावाच्या विदेशी चित्रपटाची कॉपी केल्याचा आरोप किरण राववर करण्यात आला आहे. दोन्ही चित्रपटांमधील एकाच सीन्सचे कोलाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
व्हायरल होणाऱ्या काही पोस्टमध्ये Fabrice Bracq ची १९ मिनिटांची शॉर्ट फिल्म ‘बुर्खा सिटी’चा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मिडल इस्टवर आधारित या चित्रपटात एक नवविवाहित पुरुषाची कथा आहे; ज्याच्या बायकोची बुरख्यामुळे आदला-बदली होते. त्यानंतर तो आपल्या बायकोला शोधण्यासाठी निघतो. त्यामुळेच अनेक नेटकऱ्यांना ‘बुर्खा सिटी’ची कथा ‘लापता लेडीज’ चित्रपटासारखी वाटतं आहे. दोघांमध्ये फरक एवढाचं आहे की, ‘लापता लेडीज’मध्ये घूंघट आहे आणि ‘बुर्खा सिटी’मध्ये बुर्खा आहे. इतकंच नाही तर, नेटकऱ्यांनी ‘लापता लेडीज’ची कथा ‘घूंघट के पट खोल’ चित्रपटाचीसारखी असल्याचंही म्हटलं आहे.
थोडी खट्याळ, गोंडस आणि हळवी कहाणी! अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंच्या ‘अशी ही जमवा जमवी’चा ट्रेलर रिलीज
व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी किरण रावला ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “‘लापता लेडीज’ चित्रपटाला ऑस्कर्ससाठी पाठवलं होतं. त्याच्या पेक्षा ओरिजनल कथा असलेल्या चित्रपटाला तरी निवडलं असतं.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हे खूप लज्जास्पद आहे. हुबेहूब सीन्स कॉपी केले आहेत.”, “किरणने बुरख्याच्या जागी घूंघट कसा काय घेतला? ‘बुरखा सिटी’ची खूप विचित्र पद्धतीने कॉपी करण्यात आली आहे. हे दुःखद आहे.”, “बॉलिवूडकडून आणखी काय अपेक्षा करता येईल. ही इंडस्ट्री फक्त चोरीवर चालते. प्रत्येक इतर चित्रपटातील इथे आशय कॉपी केला जातो.”दरम्यान, या वादावर किरण रावची अधिकृतरित्या प्रतिक्रिया आलेली नाही.