सुपरहिट 'दंगल' सिनेमा पाकिस्तानमध्ये का प्रदर्शित झाला नाही? आमिर खाननेच सांगितले कारण
‘बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानचा (Aamir Khan) २०१६ साली रिलीज झालेल्या ‘दंगल’ चित्रपट हा त्याच्या कारकीर्दीतील सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत देशासह जगभरात अनेक विक्रम रचले होते. गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. जगभरात ‘दंगल’चं भरभरुन कौतुक झालं. परंतु, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ चित्रपट मात्र पाकिस्तानात प्रदर्शित झाला नव्हता. याचा खुलासा अभिनेत्याने एका मुलाखतीतून केला आहे.
सध्या आमिर खान ‘सितारे जमिन पर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशनदरम्यान अभिनेत्याने ‘आप की अदालत’ या टिव्ही शोमध्ये उपस्थिती लावली होती. या शोमध्ये अभिनेत्याने ‘दंगल’ चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न होण्यामागील कारण सांगितलं आहे. पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने आमिरला ‘दंगल’ चित्रपटातून भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आणि भारतीय राष्ट्रगीत काढून टाकण्यास सांगितले होते. मुलाखतीमध्ये आमिरने खुलासा केला की, ” ‘दंगल’ चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये डिस्नेचाही समावेश होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पाकिस्तानच्या सेन्सॉरने चित्रपटाच्या शेवटी ज्या दृश्यात गीता फोगाट सामना जिंकते, त्या दृश्यामधील भारतीय ध्वज आणि राष्ट्रगीत काढून टाकण्याची मागणी केली होती. ”
लिव्हरच्या गंभीर आजाराचा सामना करतेय ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री, म्हणाली- “परिस्थिती आणखी बिकट…”
“हे कळाल्यानंतर मी डिस्नेला वेळ न दवडता सांगून टाकले की, आपला चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही. खूप नुकसान होईल. त्याचा चित्रपटाच्या कमाईवरही परिणाम होईल, यावर असं त्यांनी मला सांगितले. निर्मात्यांच्या प्रतिक्रियेवर मी त्यांना उत्तर दिले की, आम्हाला राष्ट्रध्वज काढून टाकण्यास सांगतील आणि जे आम्हाला आमचं राष्ट्रगीत काढून टाकण्यास सांगतील ते मला ते मान्य नाही. मला असा व्यवसाय नको.” आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. ‘दंगल’ ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३७४.४३ कोटींची कमाई केली, तर जगभरात सर्वाधिक २,०२४ कोटींची कमाई केली. सुपरस्टार आमिर खान फार प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २०२२ मध्ये रिलीज झालेला ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या फ्लॉपनंतर, अभिनेत्याने अभिनयातून ब्रेक घेतला होता.
किरण खेर यांचं आयुष्य होतं संघर्षमय, ‘या’ कारणानं झाला होता पहिल्या पतीसोबत घटस्फोट
त्यानंतर आमिर ‘सितारे जमीन पर’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या आमिर खान ‘सितारे जमिन पर’ या आगामी चित्रपटामुळे कमालीचा चर्चेत आहे. या चित्रपटात आमिर खानसह अभिनेत्री जिनिलिया देशमुखदेखील मुख्य भूमिकेत आहे. या दोघांव्यतिरिक्त चित्रपटात आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भानुशाली आणि आशीष पेंढसे, ऋषी शहाणी, ऋषभ जैन, नमन मिश्रा, सिमरन मंगेशकर असे नवोदित कलाकार आहेत.