Bigg Boss Ott 3 Fame Sana Makbul Sufferes From Liver Cirrhosis
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी ३ फेम अभिनेत्री विनर सना मकबुल गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. त्यामुळे चाहते चिंतेत आहेत. काही दिवसांपूर्वी तिनं हॉस्पिटलमधून स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती खूप दुःखी दिसत होती. सना सध्या लिव्हर सिरोसिस या गंभीर आजाराचा सामना करत आहे. यावर सध्या ती उपचार घेत असून अभिनेत्रीने तिचे हेल्थ अपडेट दिले आहेत.
किरण खेर यांचं आयुष्य होतं संघर्षमय, ‘या’ कारणानं झाला होता पहिल्या पतीसोबत घटस्फोट
अलीकडेच सना मकबूल हिने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “गेल्या काही दिवसांपासून मी ऑटोइम्यून हेपेटायटीसने त्रस्त आहे, परंतु माझी परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. माझी इम्यून सिस्टम माझ्या लिव्हरवर परिणाम करतेय. नुकतंच मला कळलं की, मला लिव्हर सिरोसिस आहे. या कठीण काळातही मी मजबूत राहण्याचा प्रयत्न करतेय. मी आणि डॉक्टर कोणत्याही परिस्थितीत लिव्हर ट्रान्सप्लान्ट टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. माझ्यावर इम्युनोथेरपी देखील सुरू झाली आहे.”
जाता जाता ११ स्वप्ने पूर्ण करुन गेलेला सुशांत सिंह राजपूत, अधूरी राहिली ‘ही’ ३९ स्वप्ने
मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये सनाने सांगितलं की, ” माझी फक्त अशी इच्छा आहे की, ट्रान्सप्लान्टसारख्या मोठ्या गोष्टीची आवश्यकता न पडता हा आजार बरा व्हावा. जरी ते माझ्यासाठी अजिबात सोपं नसेल. पण मी इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. हा आजार मला एका रात्रीत झाला नाही. मी बऱ्याच काळापासून या आजाराने ग्रस्त आहे. पण आता तो खूप वाढला आहे, ज्यामुळे मला माझं काम थांबवावं लागलं. यामुळे माझं मन थोडं दुखावलं, कारण मी यश मिळविण्यासाठी खूप मेहनत केली आहे आणि आता सर्वकाही चांगलं होत असताना, माझी हेल्थ फारशी चांगली नाही. मी आता हळूहळू या आजाराचा सामना करतेय आणि सध्याच्या काळात हेच सर्वात महत्त्वाचं आहे.”