Kirron Kher Birthday Befor Marrying Anupam Kher Actress Marry Gautam Berry
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) यांचे नाटक आणि चित्रपटसृष्टीला विशेष योगदान आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच सर्वांसोबत खेळकर आणि काहीशा खोडकर स्वभावाने रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या किरण खेर यांचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्री किरण खेर आज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करीत आहे.
१४ जून १९५२ रोजी पंजाबच्या चंदीगढमध्ये एका शीख कुटुंबात जन्म झाला आहे. अभिनेत्री किरण खेर आणि अभिनेते अनुपम खेर हे बॉलिवूडचे पावर कपल म्हणून ओळखले जातात. त्या दोघांची लव्ह स्टोरी ही खूप फिल्मी आहे. अनेक कठीण प्रसंगांमध्ये त्या दोघांनी एकमेकांना साथ दिली आहे. अभिनेत्री किरण खेर यांच्या वाढदिवसानिमित्त किरण आणि अनुपम यांची सदाबहार लव्हस्टोरी जाणून घेऊया…
जाता जाता ११ स्वप्ने पूर्ण करुन गेलेला सुशांत सिंह राजपूत, अधूरी राहिली ‘ही’ ३९ स्वप्ने
अनुपम खेर आणि किरण खेर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहे. हे कपल एकमेकांसाठी मेड फॉर इच अदर असून त्यांचं दुसरं लग्न आहे. किरण यांनी पहिलं लग्न सिनेनिर्माते गौतम बेरी यांच्यासोबत १९७९ मध्ये पहिलं लग्न केलं होतं. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आल्यानंतर किरण यांची भेट गौतम बेरी यांच्याशी झाली. दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांनी १९७९ मध्ये लग्न केलं.
‘ऊत’ चित्रपटातून नव्या जोडीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण…
किरण आणि गौतम यांना एक मुलगा होता. ज्याचं नाव सिकंदर आहे. सिकंदरच्या जन्मानंतर दोघांमध्ये वाद व्हायला लागला. अखेर किरण आणि गौतम यांनी १९८५ मध्ये घटस्फोट घेतला. त्यावेळी सिकंदर पाच वर्षांचा होता. नेमकं किरण आणि गौतम यांच्यामध्ये कोणत्या कारणामुळे घटस्फोट झाला, याचं कारण आजही गुलदस्त्यातच आहे. अनुपम खेर आणि किरण खेर यांची पहिली भेट चंदीगडमध्ये झाली होती. ते दोघेही एका थिएटरमध्ये एकत्र काम करत होते. दोघांमध्ये मैत्री होती.
लेखकांच्या विविध मागण्यांसाठी मानाचि लेखक संघटनेचे निवेदन
किरण यांनी घटस्फोटाचं दुःख सोसल्यानंतर कसंबसं स्वतःला सावरलं. त्यानंतर किरण यांनी आयुष्यात खंबीरपणं पुढं जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतःला अभिनयात झोकून दिलं. त्या नाटकात काम करू लागल्या. याच काळात त्यांची भेट अनुपम यांच्याशी झाली. पहिल्या भेटीमध्ये दोघांमध्ये औपचारिक बोलणं झालं. हळूहळू त्या दोघांच्या गाठीभेटी होऊ लागल्या आणि त्याच काळात दोघांच्या लक्षात आलं की, ते एकमेकांचे चांगले आयुष्याचे साथीदार होऊ शकतात. किरण यांच्याप्रमाणेच अनुपम याचंही पहिल लग्न झालं होतं. परंतु ते लग्न त्यांना पसंत नव्हतं. न आवडणाऱ्या नात्यात ते राहत होते. काही दिवसांनीही त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.
“चार लोक मेले की बघू..”; शशांक केतकर इतकं कोणावर संतापला ? Video Viral
त्यानंतर अनुपम यांच्या आयुष्यात किरण आल्या. दोघंजण एकमेकांची दुःख समजून घेत होते. त्यामुळेच एकमेकांना आयुष्याचा जोडीदार म्हणून त्यांनी निवडलं आणि त्यांनी लग्न देखील केलं. १९८५ मध्ये अनुपम आणि किरण यांनी लग्नगाठ बांधली. अनुपम काश्मिरी ब्राह्मण तर किरण या पंजाबी कुटुंबातील होत्या. परंतु दोघांच्या कुटुंबानं त्यांचं नातं आनंदानं स्वीकारलं.