Marathi Actress Shared Special Post For Mns Raj Thackeray On The Occasion Of His Birthday
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज ठाकरे त्यांचा ५७ वा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करीत आहेत. त्यांना सोशल मीडियासह प्रत्यक्षात भेटून पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण अनेकदा पाहिले आहे. राज्यातल्या मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज ठाकरे यांना सर्वच स्तरांतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मराठी कलाकारांनीही राज ठाकरेंना खास पोस्ट लिहित शुभेच्छा दिल्या आहेत.
लिव्हरच्या गंभीर आजाराचा सामना करतेय ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री, म्हणाली- “परिस्थिती आणखी बिकट…”
लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री- निर्माती तेजस्विनी पंडित, अभिनेत्री सायली संजीव आणि गायिका वैशाली माडे यांनी राज ठाकरेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे. या सेलिब्रिटींनी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केलेल्या आहेत. नेते राज ठाकरे यांच्यासोबत फोटो शेअर करत आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितने लिहिले की, “मराठी अस्मितेच्या पाठीराख्याला, मराठी भाषेच्या पोषिंद्याला, महाराष्ट्राच्या भूमीपुत्राला आणि ह्या सगळ्या पलीकडे एका मनस्वी, सच्च्या ,अनोख्या व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा! राजसाहेब… खरंच, तुमच्यासारखा सच्चा देवाने बनवणं केव्हाच सोडून दिलं! देव तुम्हाला दीर्घायु देवो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो! हसत रहा ”
अभिनेत्री सायली संजीव आणि गायिका वैशाली माडे यांनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सेलिब्रिटींनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडूनही शुभेच्छा दिल्या जात आहेत. अनेक सेलिब्रिटी मंडळी राज ठाकरे यांच्या आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जाताना दिसत असतात. अनेकदा मराठी सेलिब्रिटी राज ठाकरेंकडे मराठी चित्रपटाला पुरेशा स्क्रिन उपलब्ध होत नाही. या मागणीसाठी ते जाताना पाहायला मिळतात.
किरण खेर यांचं आयुष्य होतं संघर्षमय, ‘या’ कारणानं झाला होता पहिल्या पतीसोबत घटस्फोट
जाता जाता ११ स्वप्ने पूर्ण करुन गेलेला सुशांत सिंह राजपूत, अधूरी राहिली ‘ही’ ३९ स्वप्ने