Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्लॅनेट मराठी ओटीटी येणार आता नवीन रूपात, अभिजित पानसे डायरेक्टर कॉन्टेन्ट बोर्डवर; नवी वेबसीरीजही येणार प्रेक्षकांच्या भेटीस!

आता प्लॅनेट मराठीने पुन्हा एकदा विस्तार करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे आणि याचाच भाग म्हणून प्लॅनेट मराठीच्या डायरेक्टर कॉन्टेन्ट बोर्डवर अभिजित पानसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 09, 2024 | 04:39 PM
प्लॅनेट मराठी ओटीटी येणार आता नवीन रूपात, अभिजित पानसे डायरेक्टर कॉन्टेन्ट बोर्डवर; नवी वेबसीरीजही येणार प्रेक्षकांच्या भेटीस!
Follow Us
Close
Follow Us:
जगातील पहिले मराठी ओटीटी हा मान मिळवणाऱ्या ‘प्लॅनेट मराठी’ने (Planet Marathi) आपल्या जगभरातील मराठी प्रेक्षकांना कायमच दर्जेदार कॉन्टेन्ट दिला. अनेक उत्कृष्ट चित्रपट, (Movies) वेबफिल्म्स, (Webmovies) वेबसीरिज (Webseries), शॉर्ट फिल्म्स (Short Films) त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्या. अनेक चित्रपटांनी चित्रपट महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवली. आता प्लॅनेट मराठीने पुन्हा एकदा विस्तार करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे आणि याचाच भाग म्हणून प्लॅनेट मराठीच्या डायरेक्टर कॉन्टेन्ट बोर्डवर अभिजित पानसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजीत पानसे यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांसाठी लेखन, दिग्दर्शन केले आहे. त्यांची ‘रानबाजार’ या वेबसीरिजने इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडवून दिली होती.  प्रेक्षकांसह, शाम बेनेगल, एन. चंद्रा अशा अनेक मान्यवरांनी त्यांच्या या वेबसीरिजचे कौतुक केले. अनेक धाडसी, ज्वलंत, संवेदनशील विषयांना वाचा फोडणे, ही अभिजित पानसे यांची खासियत. या कारणामुळेच त्यांची कलाकृती ही नेहमीच इतरांपेक्षा हटके आणि सुपरहिट झाली आहे. आता ते प्लॅनेट मराठीसोबत जोडले गेल्यामुळे येत्या काळात प्लॅनेट मराठीचा चढता आलेख पाहायला मिळणार आहे.
[read_also content=”हृता दुर्गुळे पाहतेय तिच्या ‘नवरोबा’ची वाट, ‘कन्नी’ मधील रॅप साँग प्रदर्शित! https://www.navarashtra.com/photos/rap-song-from-kanni-movie-released-nrps-505609.html”]
याव्यतिरिक्त अभिजीत पानसे यांचे रावण  फ्युचर प्रोडक्शन्स आणि श्रीरंग गोडबोले यांचे इंडियन मॅजिक आयने एकत्र येऊन, प्लॅनेट मराठीच्या सहकार्याने प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणि भन्नाट घेऊन येण्यासाठीही सज्ज झाले आहेत. याबाबतची घोषणा त्यांनी नुकतीच केली असून येत्या काळात प्रेक्षकांना ‘रानबाजार २’ आणि जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ या नाटकावर प्रेरित होऊन एक नवीन वेबसीरिज प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.
या नियुक्तीबद्दल अभिजित पानसे म्हणतात, ” हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये जसे एकमेकांचे हात पकडून भव्यदिव्य कलाकृती निर्माण केली जाते. तसे मराठी इंडस्ट्रीमध्ये फार कमी घडते. मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक जण स्वतंत्ररित्या काम करतात. फार कमी असे आहेत जे एकत्र येऊन काम करतात. त्यामुळे मराठीत जर अशी भव्यदिव्य कलाकृती निर्माण करायची असेल तर मराठी इंडस्ट्रीने एकत्र येऊन एखादी संघटना उभारणे गरजेचे आहे. याचाच आरंभ म्हणून मी आणि इंडियन मॅजिक आय एकत्र आलो. महाराष्ट्राच्या विविध भागांत असंख्य प्रतिभाशाली कलावंत आहेत, ज्यांना कलाकृती सादर करण्यासाठी, एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या आमचा हा प्रयत्न आहे. अशा प्रकारचा मराठीतील पहिला स्टुडिओ उभारण्याचा आमचा मानस आहे. त्यात प्लॅनेट मराठी सारखे व्यासपीठ लाभल्याने हे अधिकच आनंददायी आहे.”
या नवीन उपक्रमाबद्दल दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले म्हणतात, ” मागील तीस वर्षांपासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे. यादरम्यान मला एक जाणवले, आजवर अनेक उत्तम कलाकृती सादर केल्या. परंतु त्या देशभर, जगभर पोहोचवण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतो. त्यामुळे आता प्लॅनेट मराठी सारख्या जगातील पहिले मराठी ओटीटीच्या, अक्षय बर्दापूरकर, अभिजित पानसे यांच्या सहकार्यांने आम्ही या मराठी कलाकृती जगाच्या पटलावर आणू.”
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” अभिजित पानसे डायरेक्टर कॉन्टेन्ट म्हणून रुजू झाल्यामुळे त्यांची जी मराठी इंडस्ट्रीबद्दलची दूरदृष्टी आहे, जी प्लॅनेट मराठीच्या विस्तारासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे, हे मी खात्रीने सांगू शकतो. त्यांच्यासोबतच तीन दशकांहून अधिक काळ या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारे श्रीरंग गोडबोले, ज्यांनी २५ हून अधिक मालिका केल्या आहेत. पाच चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. हा त्यांचा दांडगा अनुभव आमच्या पुढील वाटचालीसाठी नक्कीच उपयोगी येणार आहे. या सगळ्याच्या सहयोगानेच मराठीत एक मोठे युनिट उभे राहू शकते.”

Web Title: Abhijit panse join director content board of plant marathi ott nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2024 | 04:39 PM

Topics:  

  • entertainment
  • planet marathi

संबंधित बातम्या

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश
1

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो
2

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…
3

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’
4

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.