Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yek Number Movie : रांगडं व्यक्तिमत्व अन् नजरेत दरारा, ‘येक नंबर’ चित्रपटाचा धडाकेबाज पोस्टर रिलीज

गेल्या काही दिवसांपूर्वी 'येक नंबर' चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासून 'येक नंबर' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 04, 2024 | 05:45 PM
एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी, तेजस्विनी पंडीतच्या 'येक नंबर' चा खतरनाक ट्रेलर रिलीज

एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी, तेजस्विनी पंडीतच्या 'येक नंबर' चा खतरनाक ट्रेलर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

Yek Number Movie Poster : झी स्टुडिओज् आणि नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेन्मेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘येक नंबर’ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रपट रिलीज होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. पोस्टरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवली. प्रेक्षकांना या पोस्टरमधील तरुण कोण, हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा होती. तर आता या गोष्टीवरून पडदा उठला असून हा रांगड्या व्यक्तिमत्वाचं नाव धैर्य घोलप आहे.

हे देखील वाचा – ऑन-स्क्रीन शिक्षकांची झलक दाखवणाऱ्या ‘या’ पाच कलाकारांवर टाका नजर!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये मराठमोळा अभिनेता धैर्य घोलप दिसत आहे. धैर्य घोलप या चित्रपटात एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळत असून, त्याच्या देहबोलीतूनच मनातील क्रोध व्यक्त होत आहे. याव्यतिरिक्त या पोस्टरमध्ये लक्षवेधी ठरत आहे, ती एक करारी नजर, जी महाराष्ट्राच्या परिचयाची आहे. या सगळ्यात अधिक भर घालत आहे, ते गूढ, रहस्यमयी संगीत. त्यामुळे या सगळ्यामागे नेमके काय दडले आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना दसऱ्याची वाट पाहावी लागणार आहे.

 

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणतात, “या चित्रपटासाठी मला एक असा नवीन चेहरा हवा होता, जो प्रेक्षकांना आपल्यातलाच एक वाटेल. त्यामुळे धैर्यचा रांगडा लूक मला या व्यक्तिरेखेसाठी अतिशय योग्य वाटला. त्यानेही या व्यक्तिरेखेला उत्तम न्याय दिला आहे.”

निर्माती तेजस्विनी पंडित म्हणते, “प्रेक्षकांची अनेकदा तक्रार असते की, मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्ट्या, सादरीकरणात भव्यता नसते. हाच समज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या चित्रपटात अनेक कुशल, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञांचा सहभाग आहे. ही भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर नक्कीच दिसेल. या सगळ्याचे श्रेय या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला जाते.”

हे देखील वाचा – दीड वर्ष अन् ७ खून; ‘मानवत मर्डर’ मध्ये केव्हाही न पाहिलेला मराठी कलाकारांचा अंदाज

तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला ह्या ‘येक नंबर’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर या चित्रपटाला, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला आपल्या संगीतावर ठेका धरायला लावणारे, अजय -अतुल यांचे धमाकेदार संगीत लाभले आहे. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. बहुप्रतीक्षित असलेला “येक नंबर’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याच्या सोन्यासोबतच चित्रपटाचाही आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे.

Web Title: Actor dhairya gholap starrer yek number marathi movie will be released on october 10 movie produced tejaswwini pandit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 05:45 PM

Topics:  

  • Entertainement News
  • tejaswini pandit

संबंधित बातम्या

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत
1

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत

बॉलीवूडचा पर्दाफाश : ए-लिस्टर स्टार्सची फी आणि दिखावटी कास्टिंग उघडकीस, Imran Khanने केली पोलखोल
2

बॉलीवूडचा पर्दाफाश : ए-लिस्टर स्टार्सची फी आणि दिखावटी कास्टिंग उघडकीस, Imran Khanने केली पोलखोल

Tanya Mittal ची मिमिक्री करणे पडले भारी, जेमी लिव्हरने घेतला सोशल मीडियावर ब्रेक; म्हणाली ‘मिळालेल्या प्रेमासाठी…’
3

Tanya Mittal ची मिमिक्री करणे पडले भारी, जेमी लिव्हरने घेतला सोशल मीडियावर ब्रेक; म्हणाली ‘मिळालेल्या प्रेमासाठी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.