(फोटो सौजन्य- Social Media)
संपूर्ण भारत शिक्षक दिन साजरा करत असताना, आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या मार्गदर्शकांचा आपण सन्मान करतो. काही लोक त्यांच्या शिक्षकांशी पुन्हा संपर्क साधतात, तर काही लोक त्यांच्याबद्दल भावनिक मार्गाने कृतज्ञता व्यक्त करतात. बॉलीवूडनेही शिक्षकांना पडद्यावर दाखवून आदरांजली वाहिली आहे. हे असे पाच अभिनेते आहेत ज्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
1. विद्या बालन – शकुंतला देवी
विद्या बालने ‘शकुंतला देवी’ या चित्रपटामध्ये गणिताच्या शिक्षिकेची भूमिका साकारली होती. हा चित्रपट केवळ शकुंतला देवीच्या बुद्धिमत्तेचेच प्रदर्शन करत नाही तर तिला एक आई आणि एक स्त्री म्हणून सादर देखील केले आहे. अभिनेत्री विद्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे या गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेला जिवंत करण्यात आले, ज्यामुळे अभिनेत्रीला या भूमिकेमुले भरपूर प्रशंसा मिळाली.
2. राणी मुखर्जी – हिचकी
‘हिचकी’ चित्रपटात राणी मुखर्जीने टॉरेट सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. हे असे पात्र आहे जे आपल्या सर्वांना आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला आवडेल. हा चित्रपट एका स्त्रीची प्रेरणादायी कथा सांगतो जी तिच्या सर्वात मोठ्या आव्हानाला तिच्या सर्वात मोठ्या शक्तीमध्ये बदलते. या चित्रपटातील अभिनेत्रीची भूमिका पाहून तिला परीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली आहे.
3. आमिर खान – तारे जमीन पर
‘तारे जमीन पर’मध्ये आमिर खानने पहिल्यांदा शिक्षकाची भूमिका साकारली होती. त्याने राम शंकर निकुंभ या कला शिक्षकाची भूमिका साकारली होती. जो एका तरुण मुलाला म्हणजेच इशानला डिस्लेक्सियावर मात करण्यास आणि त्याच्या खऱ्या क्षमतेचा स्वीकार करण्यास मदत करतो. आमिरची सहानुभूतीपूर्ण कामगिरी ही एका चांगल्या शिक्षकाचे लक्षण दर्शवणारा आहे. या भूमिका साकारताना अमीर ने आपल्या अभिनय कौशल्यवर भर दिली. आणि चाहत्यांचे कौतुक देखील मिळवले.
४. हृतिक रोशन – सुपर ३०
विकास बहल दिग्दर्शित ‘सुपर ३०’ हा चित्रपट बिहारचे प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. हृतिक रोशनने हे पात्र पूर्ण प्रामाणिकपणे साकारले आहे, काही शिक्षक विद्यार्थांना उच्च आणि कनिष्ठ दर्शविताना या चित्रपटामध्ये दाखवले आहे. हेच नष्ट आनंद कुमार यांनी मेहनत घेतली असून त्यांनी वंचित विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. अभिनेता हृतिक रोशने यांची भूमिका एकदम प्रामाणिक आणि उत्कृष्ट साकारली होती.
5. शाहिद कपूर – पाठशाळा
शाहिद कपूरने ‘पाठशाळा’ मध्ये राहुल उदयवार या संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे, जो विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांशी चांगला संवाद साधतो आणि शाळेतील समस्यांविरोधात आवाज उठवण्याची प्रेरणा देतो. त्यांचे मनमोहक व्यक्तिमत्व सर्वांच्या मनाला भावणारे आहे. शाहिद कपूरला या भूमिकेसाठी चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि कौतुक देखील केले.