Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्टाईल’फेम अभिनेत्याने २६ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न, वर्षभरातच पत्नीचं धर्मांतर; इस्लाम धर्म स्वीकारण्यावरून नेटकरी भडकले

'स्टाइल' फेम अभिनेता साहिल खानने गेल्या वर्षी त्याच्यापेक्षा २६ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडशी दुसरं लग्न केलं आहे. लग्नाच्या वर्षभरानंतर त्याच्या पत्नीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 15, 2025 | 02:31 PM
'स्टाईल'फेम अभिनेत्याने २६ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न, वर्षभरातच पत्नीचं धर्मांतर; इस्लाम धर्म स्वीकारण्यावरून नेटकरी भडकले

'स्टाईल'फेम अभिनेत्याने २६ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न, वर्षभरातच पत्नीचं धर्मांतर; इस्लाम धर्म स्वीकारण्यावरून नेटकरी भडकले

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता, फिटनेस एंटरप्रन्योर (Fitness Entrepreneur) आणि युट्यूबर साहिल खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. वर्षभरापूर्वी दुसरं लग्न केलं होतं. त्याच्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत साहिलने लग्न केलं आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव मिलेना अलेक्जांड्रा असं आहे. काही तासांपूर्वीच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या पत्नीने इस्लाम धर्माचा स्वीकार केल्याचे सांगितले आहे. अभिनेत्याची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्याच्यावर प्रचंड संतापले आहेत.

न्यूड आणि किसिंग सीनचा किंग नील नितीन मुकेश सध्या काय करतो? पत्नी-मुलं ते संपत्तीपर्यंत सर्व काही जाणून घ्या

साहिल खानने २०२४ मध्ये मिलेनाशी युरोपमध्ये लग्न केले. साहिलची दुसरी पत्नी मिलेना ही युरोपमधील बेलारूसची आहे. लग्न केल्याच्या काही महिन्यानंतर मिलेनाने धर्मपरिवर्तन केलं असल्याचं समोर आलं आहे. यामुळे ४८ वर्षीय साहिलला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे. ‘हे करणं गरजेचं होतं का?’ असा सवाल नेटकऱ्यांनी साहिलला विचारला आहे. काही युजर्सचे म्हणणे आहे की, साहिल खानने त्याच्या पत्नीवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकलाय. त्यामुळे साहिल खान नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.

 

पत्नीसोबतचा फोटो पोस्ट करत साहिलने पत्नीच्या धर्मपरिवर्तनाबद्दल चाहत्यांना सांगितले की, “मला हे सांगताना अत्यंत गर्व वाटतोय की, माझी पत्नी मिलेना ॲलेक्झांड्राने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. अल्लाहचं नाव घेत आम्ही सुंदर प्रवासाला सुरुवात करत आहोत. अल्लाह आम्हाला माफ करा आणि आमची प्रार्थना स्वीकारा.”, असं त्याने पोस्टमध्ये लिहिलंय. यावरून अनेकांनी साहिलवर टीका केली आहे. दरम्यान, साहिलची पत्नी केवळ २२ वर्षांचीच आहे. जेव्हा त्यांनी लग्न केलं त्यावेळी ती फक्त २१ वर्षांचीच होती. साहिल आणि मिलेनामध्ये तब्बल २६ वर्षांचं अंतर आहे. याआधीने साहिलने २००३मध्ये निगार खानबरोबर लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. साहिल आणि निगारने २००५ साली घटस्फोट घेतला.

प्रसाद ओक साकारणार आगामी सिनेमात लक्षवेधी भूमिका; म्हणाले – ‘हा एक श्री नटराजाचा आशीर्वाद’!

साहिल खानच्या पत्नीच्या धर्मपरिवर्तनाच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत म्हणतात की “जर तुमचं दोघांचंही खरोखर एकमेकांवर प्रेम आहे तर तिने धर्म बदलण्याची गरजच काय?”, “तुझं तिच्यावर खरं प्रेम असेल तर तूच ख्रिश्चन धर्म स्वीकारायला काय हरकत होती?”, “काहीही अध्ययन आणि शोध न घेता इस्लाम स्वीकारण्याचा काय फायदा? केवळ इस्लामच नाही तर फक्त लग्न करण्यासाठी धर्म स्वीकारण्याचा काय फायदा जर तुमच्या दोघांचं नातं घट्ट आहे.”, “लग्नानंतर धर्म परिवर्तन करणं गरजेचं आहे का?”

Web Title: Actor sahil khan wife milena alexandra converts to islam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • Sahil Khan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.