(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक नवनवीन कलाकृती घेऊन प्रेक्षकांचं सतत मनोरंजन करताना दिसत असतो. प्रेक्षकांचा हा आवडताअभिनेता चित्रपटातून पडद्यावर तर कधी पडद्यामागून दिग्दर्शकाच्या भूमिकेत राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. गेल्यावर्षी प्रसादने ‘धर्मवीर २’ मधून दमदार अभिनयाचे प्रदर्शन करत पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आणि आता अभिनेता प्रसाद ओक दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या बायोपिकचे दिग्दर्श करताना दिसणार आहेत. तसेच, मराठीतील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाची भूमिका साकारणार आहे. प्रसाद मराठी चित्रपटसृष्टी उभी करण्यात मोलाचा वाटा असणारे निर्माते, दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार आहे.
मराठी सिनेमा विश्वात आजवर अनेक महान लोकांचे चरित्रपट होऊन गेले आणि नव्या वर्षात अश्याच एका महान व्यक्तीची गोष्ट आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टी उभी केली जात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यातलं एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे “बाबुराव पेंटर.” हे आहे. मराठी सिनमांमध्ये हल्ली वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपट होताना दिसतात आणि आता अश्या एका महान व्यक्तीवर चित्रपट होतोय ही मराठी सिनेमा विश्वासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.
अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रसाद ओक याने या बद्दल सोशल मीडिया वर एक पोस्ट लिहून या बद्दल माहिती दिली असून प्रसाद बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार असल्याचे समजले आहे. या बद्दल बोलताना अभिनेता प्रसाद ओक म्हणाले की, ‘बाबुराव पेंटर यांच्या जीवनाराव आधारित भव्य कलाकृती निर्माण होत आहे आणि चित्रपटाची संपूर्ण टीम त्यासाठी झटून काम करत आहेत. दिग्गज बाबुराव पेंटर यांची भूमिका मला साकारायला मिळणं हा श्री नटराजा आणि गणपती बाप्पाचा मला मिळालेला आशीर्वाद आहे”. असे अभिनेत्याने सांगितले आहे. अभिनेत्याला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.
Bigg Boss 18 : आईचे पत्र वाचताना करणवीर मेहरा झाला भावूक, अश्रू झाले अनावर
आता या चित्रपटात अजून कोण कोण दिसणार? हा चित्रपट कशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार? या चित्रपटाची कथा काय असणार? हे सगळं अद्याप गुलदस्त्यात आहे. 2025 वर्षात प्रसाद ओक अनेक चित्रपट करणार असून आता या चित्रपटासाठी देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. प्रसादसाठी अभिनेता म्हणून हे वर्ष खास असणार आहे. त्याचा ‘जिलेबी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शत होणार आहे तर याचवर्षी मे महिन्यात त्याचा ‘गुलकंद’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.तर तो सध्या दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्यावरील बायोपिकवर काम करत असून तो या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या एप्रिल महिन्यात प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला – सुजीत’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.