न्यूड आणि किसिंग सीनचा किंग नील नितीन मुकेश सध्या काय करतो? पत्नी-मुलं ते संपत्तीपर्यंत सर्व काही जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश दिसायला अगदी ब्रिटीश लोकांसारखा आणि राजबिंडा… कायमच आपला लूकमुळे चर्चेत राहणाऱ्या नील मुकेशचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्याचे खरे नाव नील नितीन मुकेश चंद माधूर आहे. अभिनेत्याचा जन्म १५ जानेवारी १९८२ रोजी मुंबईत झालाय. त्याच्या घरी संगीत पार्श्वभूमी आहे. पण संगीत पार्श्वभूमी असतानाही नील अभिनय क्षेत्रात आला.
नेटकऱ्यांची तोंडं केली बंद, अखेर युविका-प्रिन्स आपल्या परीसह दिसले एकत्र; पहिली Lohri केली साजरी
नील नितीन मुकेश यांची आजी गुजराती श्रीमाली ब्राह्मण होती तर त्यांचे आजोबा दिल्लीचे माथुर कायस्थ आणि प्रसिद्ध गायक होते. नीलला हे नाव प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी दिले होते. लता मंगेश या त्यावेळी नील आर्मस्ट्राँगमुळे खूप प्रभावित झाल्या होत्या. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा अभिनेत्याला पाहिले, तेव्हा त्या म्हणाल्या की, याचं नाव नील ठेवा. आणि तेव्हापासून त्याला नील हे नाव मिळाले. नील या आपल्या नावासोबतच आपल्या वडिलांचं आणि आजोबांचं नाव देखील लावतो.
‘असंभव’ चित्रपटात मुक्ता बर्वेनंतर नव्या अभिनेत्रीची एन्ट्री, सचित पाटिलसोबत करणार पहिल्यांदाच काम!
नील नितीन मुकेश शेवटचा ‘बायपास रोड’ चित्रपटात विक्रम कपूरच्या भूमिकेत दिसला होता. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमातही तो निर्माता होता. तिने 2014 मध्ये ‘कैथी’ चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी तेलुगु इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. पण सध्या काही करत नाही. तो इंडस्ट्रीमध्ये काम का करत नाही ? याचं अद्यापही कारण अस्पष्ट असून प्रेक्षक त्याच्या डेब्यूची वाट पाहत आहेत. नील नितीन मुकेशने श्रीराम राघवनच्या ‘जॉनी गद्दार’ या थ्रिलर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता. यासाठी चित्रपटासाठी अभिनेत्याला फिल्मफेअरही मिळाला होता.
नीलने त्याच्या ‘जेल’ चित्रपटात न्यूड पोज दिल्याने तो वादातही अडकला होता. याशिवाय अभिनेत्याने याच चित्रपटात मुख्य अभिनेत्रीसोबत तब्बल ३० किसिंग सीन करून खळबळ उडवून दिली होती. ‘जन्नत’ फेम अभिनेत्री सोनाल चौहान ही ‘जेल’ या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री होती. या दोघांवर अनेक लीपलॉक सीन चित्रित झाले होते, ज्यांनी बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ माजवली होती. नील नितीन मुकेशने २०१७ मध्ये रुक्मणी सहायशी लग्न केले. यानंतर २०१८ मध्ये त्यांना मुलगी झाली. जिचे नाव नूरवी होते.