अभिनय क्षेत्रातून राजकारण क्षेत्रात रमलेले शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात परत येत आहेत. शत्रुघ्न सिन्हा ओटीटी प्लॅटफार्मवर पदापर्ण करत (Shatrughna Sinha OTT Debut) असून गँग्ज ऑफ गाझियाबाद (Gangs of Gaziabad) या वेब सीरिजमधून ते प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सीरिजमध्ये आशुतोष राणा, प्रदीप नागर, जतिन सरना, अभिमन्यू सिंह, मुकेश तिवारी, माहिरा शर्मा आणि सनी लिओनी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
[read_also content=”गुजरातच्या मोरबीत मोठी दुर्घटना! निर्माणाधीन मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळला, 4 जण जखमी! https://www.navarashtra.com/india/4-injured-after-medical-college-slab-collapsed-in-gujrat-morabi-nrps-513813.html”]
शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अंकाऊटवर त्यांच्या आगामी वेबसिरिजचं पोस्टर शेअर केलं आहे. ‘गँग्स ऑफ गाझियाबाद’ असं या वेबसिरीजचं नाव असून या वेब सीरिजची कथा गुन्हेगारीच्या जगावर आधारित आहे. सुमन टॉकीजच्या बॅनरखाली या वेब सीरिजची निर्मिती विनय कुमार आणि प्रदीप नागर यांनी केली आहे. 1990 च्या दशकात उत्तर प्रदेशमधील अंडरवर्ल्डशी संबंधित घटना दाखवण्यात येणार आहेत.
अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी अभिनय क्षेत्रातून राजकारण क्षेत्रात प्रवेश केला. अनेक वर्षापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप नेते, खासदार म्हणून काम केले. काही वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या ते आसनसोलमधून खासदार आहेत.
शत्रुघ्न सिन्हाच्या यांच्या पोस्टवर सेलेब्रिटीसहीत चाहतेही कमेंट करून वेब सीरीजसाठ शुभेच्छा देताना दिसत आहेत. एका युझरनं म्हण्टलं, ”सर मी तुम्हाला एका वेगळ्या अंदाजात पाहायला खूप उत्सुक आहे. दुसऱ्या एका युझरनं म्हण्टलं, ”गँग्स ऑफ गाझियाबाद’ ही वेब सीरीज खूप सुंदर असणार आहे.” आणखी एकानं लिहिलं, सर तुम्ही प्रत्येक चित्रपटांमध्ये सुंदर दिसता.” याशिवाय या पोस्टवर काहीजण हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.