Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Indian Idol’ फेम गायिका सायली कांबळेने जाहीर केले बाळाचे नाव; जाणून घ्या काय आहे नावाचा अर्थ!

'इंडियन आयडल' मराठी गायिका सायली कांबळे नुकतीच आई झाली आहे, ती तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. आणि आता अशातच ३ महिन्यानंतर तिने आपल्या गोंडस बाळाचे नाव जाहीर केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 13, 2026 | 10:52 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सायली कांबळेने जाहीर केलं बाळाचे नाव
  • जाणून घ्या काय आहे नावाचा अर्थ
  • चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव
 

‘इंडियन आयडल’ या लोकप्रिय रिॲलिटी शोमुळे अनेक प्रतिभावान गायक-गायिका प्रकाशझोतात आले. या मंचामुळे नवोदित कलाकारांना आपली कला संपूर्ण देशासमोर सादर करण्याची मोठी संधी मिळाली. अशाच गायकांपैकी एक म्हणजे आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी सायली कांबळे देखील प्रसिद्धीच्या झोतात आली.

सायली कांबळेने ‘इंडियन आयडल’मध्ये सादर केलेल्या एकाहून एक सुंदर गाण्यांमुळे देशभरातील रसिकांची मनं जिंकली. तिच्या आवाजातील गोडवा आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे ती अनेकांच्या पसंतीस उतरली. संगीतासोबतच सायली सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांसोबत गाण्याचे व्हिडिओ, खास क्षण आणि वैयक्तिक आयुष्यातील आनंददायी क्षणही शेअर करताना दिसते.

काही महिन्यांपूर्वी सायलीने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली होती. ती आई झाल्याची गोड बातमी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर केली. तिच्या घरी एका गोंडस बाळाचं आगमन झाल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आता या आनंदात आणखी भर पडली आहे, कारण सायली आणि तिचे पती धवल पाटील यांनी आपल्या मुलाचं बारसं मोठ्या थाटामाटात पार पाडलं आहे.

 

वयाच्या 66 व्या वर्षी खरंच प्रेग्नंट आहेत नीना गुप्ता? प्रेग्नंसीच्या अफवांवर ‘ये लो, बधाई हो’ म्हणत दिली प्रतिक्रिया

सायलीने बाळासोबतचे काही गोड फोटो सोशल मीडियावर शेअर करत मुलाचं नावही जाहीर केलं आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या भावना व्यक्त करत लिहिलं की, “तीन महिन्यांपूर्वी एका इवल्याशा पावलांनी आमच्या आयुष्यात प्रवेश केला आणि आमचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. हे नाव ज्ञानापासून प्रेरित आहे आणि या नावाने एका सुंदर प्रवासाची सुरुवात होत आहे. हे नाव जगाला सांगण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो.”

यानंतर तिने आपल्या मुलाचं नाव “वेद धवल सायली पाटील” असं जाहीर केले आहे. सायलीच्या या पोस्टवर चाहत्यांनी, मित्रमैत्रिणींनी आणि इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच हे नाव देखील चाहत्यांना आवडलेले दिसत आहे. विशेष म्हणजे सायली आणि धवल यांनी लग्नानंतर तीन वर्षांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. सायली कांबळे आणि धवल पाटील या दोघांनीही २४ एप्रिल २०२२ रोजी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने मोठ्या उत्साहात लग्न केले. त्याआधी हे दोघे बराच काळ एकमेकांना डेट करत होते.

‘Dhurandhar 2’चा रिलीजपूर्वीच धमाका! ₹3100 च्या तिकिटांची झपाट्याने विक्री; ‘पुष्पा 2’चा रेकॉर्ड ब्रेक

आता सायलीच्या आयुष्यातील या नव्या टप्प्यामुळे तिच्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गाण्याच्या मंचावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही गायिका आता आईच्या भूमिकेतही तितक्याच प्रेमाने आणि आनंदाने नवीन प्रवास सुरू करत आहे. तसेच तिच्यावर चाहते प्रेमाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

Web Title: Indian idol fame singer sayli kamble reveals her baby boy name shares post on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा
1

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
3

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय
4

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.