Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या 66 व्या वर्षी खरंच प्रेग्नंट आहेत नीना गुप्ता? प्रेग्नंसीच्या अफवांवर ‘ये लो, बधाई हो’ म्हणत दिली प्रतिक्रिया

सोशल मीडियावर लोक अनेकदा एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अंदाज लावत त्यावर चर्चा करताना दिसत असतात. अशातच बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या प्रेग्नंसीच्या अफवांनी खळबळ उडवली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 13, 2026 | 09:31 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वयाच्या 66 व्या वर्षी प्रेग्नंट आहेत नीना गुप्ता?
  • प्रेग्नंसीच्या अफवांवर अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया
  • विजय आणि रश्मिकाच्या लग्नापासून चर्चा
 

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत, पण यावेळी अभिनेत्री कोणत्या चित्रपटामुळे नाही तर त्यांच्या गरोदरपणाच्या अफवांमुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असे दावे फिरत आहेत की ६६ वर्षीय नीना गुप्ता प्रेग्नंट आहेत. आता, नीना गुप्ता यांनी स्वतः या प्रकरणावर मौन सोडले आहे आणि विनोदी पद्धतीने या अफवांना नकार दिला आहे.

एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी या अफवांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. तिच्या दिसण्याबद्दल आणि लोकांच्या कमेंट्सबद्दल विचारले असता, अभिनेत्रीने यावर आता हसून उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, “आता फक्त खऱ्या आयुष्यात ‘बधाई हो’ हेच उरले होते.” लोक ‘बेबी बंप’ कशाला मानत आहेत हे तिने पुढे स्पष्ट केले. नीना म्हणाल्या, “अभिनंदन’ असे काही नाही. मी प्रेग्नंट नाही. खरं सांगायचं तर, त्या दिवशी मी घातलेल्या साडीचे मटेरियल खूप जाड होते, म्हणूनच मी कार्यक्रमात थोडी जाड दिसत होते.”

‘Dhurandhar 2’चा रिलीजपूर्वीच धमाका! ₹3100 च्या तिकिटांची झपाट्याने विक्री; ‘पुष्पा 2’चा रेकॉर्ड ब्रेक

नीना गुप्ता यांनी संपूर्ण चर्चेचा सकारात्मक दृष्टिकोन घेतला आणि त्यावर टीकाही केली. अभिनेत्री म्हणाली, “खरं सांगायचं तर, माझ्या वयात गर्भधारणेबद्दलच्या चर्चा मला खूप मजेदार वाटतात. यावरून दिसून येते की आपण एक राष्ट्र म्हणून विकसित होत आहोत आणि अशा गोष्टींबद्दलचा आपला विचार बदलत आहे.”

विजय आणि रश्मिकाच्या लग्नापासून चर्चा

नीना गुप्ता हैदराबादमध्ये साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहिल्या तेव्हापासून या चर्चेला उधाण आले. या हाय-प्रोफाइल कार्यक्रमातून, साडीमध्ये पापाराझींसाठी पोज देताना नीना यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हिडिओंखाली कमेंट करायला सुरुवात केली आणि विचारले की त्यांचे पोट मोठे दिसत आहे का? आणि त्या प्रेग्नंट आहेत का?. ही कंमेंट चांगलीच चर्चेत आली. नीना या नेहमीच चर्चेचा विषय राहिल्या आहेत.

पहाटे लवकर उठणं ते आई बाबांसाठी स्वयंपाक ; वडिलांनीच केली पोलखोल, ज्ञानदा रामतीर्थकरचा पुरस्कार सोहळ्यातला भन्नाट किस्सा

नीना गुप्ता यांचे वैयक्तिक जीवन नेहमीच प्रेरणादायी वाटते

नीना गुप्ता यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच अनेकांसाठी प्रेरणादायी राहिले आहे. १९८० च्या दशकात, जेव्हा लिव-इन रिलेशनशिप आणि अविवाहित आई होणे यांसारख्या गोष्टींवर समाजात मोठे बंधन आणि टीका होती, तेव्हा नीना गुप्ता यांनी व्हिव्ह रिचर्ड्स यांच्यासोबतचे नाते स्वीकारत आणि मुलगी मसाबा गुप्ता हिला एकटीने वाढवण्याचा धाडसी निर्णय घेत सर्वांना आश्चर्यचकित केले. त्या काळातील सामाजिक दबावाचा सामना करत त्यांनी मसाबाची जपणूक आणि संगोपन केले. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी विवेक मेहरा यांच्याशी विवाह करून आपल्या आयुष्यातील एक नवा आणि स्थिर अध्याय सुरू केला.

Web Title: Neena gupta reacts to pregnancy rumors at 66 a real life badhaai ho

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Neena Gupta

संबंधित बातम्या

AA23 Allu Arjun: अल्लू अर्जुन-लोकेश कनगराज जोडीचा धमाका! ‘AA23’ मध्ये पाहायला मिळणार आजवरचा सर्वात हटके लूक; सूत्रांचा खुलासा
1

AA23 Allu Arjun: अल्लू अर्जुन-लोकेश कनगराज जोडीचा धमाका! ‘AA23’ मध्ये पाहायला मिळणार आजवरचा सर्वात हटके लूक; सूत्रांचा खुलासा

The Paradise Teaser : नॅचरल स्टार नानीचा मोठा धमाका! ‘द पॅराडाइज’चा बहुप्रतीक्षित टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

The Paradise Teaser : नॅचरल स्टार नानीचा मोठा धमाका! ‘द पॅराडाइज’चा बहुप्रतीक्षित टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज

Mirzapur The Movie : ट्रेलरनंतर देशभर घुमणार ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा जलवा; 7–8 शहरांमध्ये होणार मेगा प्रमोशन
3

Mirzapur The Movie : ट्रेलरनंतर देशभर घुमणार ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा जलवा; 7–8 शहरांमध्ये होणार मेगा प्रमोशन

Love And War Update: भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’बाबत सर्वात मोठी अपडेट समोर! रणबीर-आलियाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला
4

Love And War Update: भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’बाबत सर्वात मोठी अपडेट समोर! रणबीर-आलियाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.