मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि सुरज नांबियार नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. आज गोव्यामध्ये मौनी आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला.
अभिनेता अर्जुन बिजलानीनं सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. मौनी आणि सूरजचा हा फोटो शेअर करून अर्जुननं कॅप्शनमध्ये लिहिले,’मिस्टर अॅण्ड मिसेस नांबियार’ अर्जुन बिजलानीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये मौनी दाक्षिणात्य लूकमध्ये दिसत आहे.
दाक्षिणात्य पद्धतीनं सूरज आणि मौनीचा लग्न सोहळा पार पडला.मौनी पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी, गोल्डन कलरचे दागिने आणि केसांमध्ये गजरा या लूकमध्ये दिसत आहे. तर मौनीचा पती सूरज हा सोनेरी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची लूंगी अशा लूकमध्ये दिसत आहे.






