Buldhana Drought Relief
शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करत दिवाळीपूर्वीच जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३० हजार १५३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत २१५ कोटी ८ लाख रुपयांची मदत्त जमा करण्यात आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीनुसार, चिखली तालुक्यात सर्वाधिक ५२ हजार ९६९ शेतकऱ्यांना २६ कोटी ४८ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्याखालोखाल मेहकर तालुक्यातील ४७ हजार ७३२ शेतकऱ्यांना २३ कोटी ८७ लाख रुपये, सिंदखेड राजा तालुक्यातील ४२ हजार ७८ शेतकऱ्यांना २१ कोटी ४ लाख रुपये, खामगाव तालुक्यातील ४० हजार २६ शेतकऱ्यांना २० कोटी १ लाख रुपये, तर बुलढाणा तालुक्यातील ३६ हजार ३३ शेतकऱ्यांना १८ कोटी २ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य वित्तरित करण्यात आले. तसेच लोणार
तालुक्यातील ३४ हजार ३८ शेतकऱ्यांना १७ कोटी २ लाख रुपये, मोताळा तालुक्यातील ३१ हजार ८१९ शेतकऱ्यांना १५ कोटी ९१ लाख रुपये, नांदुरा तालुक्यातील २७ हजार ३८८ शेतकऱ्यांना १३ कोटी ६९ लाख रुपये, तर संग्रामपूर तालुक्यातील २५ हजार ८५७ शेतकऱ्यांना १२ कोटी ९३ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील २४ हजार ७४८ शेतकऱ्यांना १२ कोटी ३७ लाख रुपये, मलकापूर तालुक्यातील २२ हजार ७५५ शेतकऱ्यांना ११ कोटी ३८ लाख रुपये, शेगाव तालुक्यातील २२ हजार ११७ शेतकऱ्यांना ११ कोटी ६ लाख रुपये, तर जळगाव जामोद तालुक्यातील २२ हजार ५९३ शेतकऱ्यांना ११ कोटी ३० लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांतील एकूण ४ लाख ३० हजार १५३ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत २१५ कोटी ८ लाख रुपयांची अग्रिम मदत जमा करण्यात आली. कमी पावसामुळे खरीप हंगामात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने उपलब्ध करून दिलेली ही मदत शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात उपयोगी ठरली. दिवाळीपूर्वीच मदतीची रक्कम खात्यात जमा झाल्याने सणासुदीच्या खर्चासह दैनंदिन गरजा आणि शेतीशी संबंधित खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळाला.
Ans: एकूण ४ लाख ३० हजार १५३ शेतकऱ्यांना मदत मिळाली.
Ans: एकूण २१५ कोटी ८ लाख रुपयांची अग्रीम मदत वितरित करण्यात आली.
Ans: पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये देण्यात आले.






