सई ताम्हणकरचा क्लासी साडी लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सई ताम्हणकर म्हणजे सौंदर्याची खाण आहे. नेहमीच आपल्या स्टाईलने आणि फॅशनने ती चाहत्यांच्या मनावर भुरळ घालत असते. सईच्या अदांनी चाहत्यांचे मन घायाळ होत असते. नुकतेच सईने साडीतील काही फोटो शेअर केले आहेत आणि काही क्षणातच तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. सईने बिंज व्हाईट रंगाची ट्रान्सपरंट साडी नेसून फोटो शेअर केले आहेत. ही डिझाईनर साडी नक्की कशी आहे आणि सईचा लुक कसा आहे आपण डिकोड करूया
सईने नेहमीप्रमाणे यावेळीही क्लासी फोटोशूट केले आहे आणि सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. सईच्या या साडीचे वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया आणि तिचे फॅशन स्टेटमेंटही डिकोड करू (फोटो सौजन्य – Instagram)
ट्रान्सपरंट साडी
सईची क्लासी साडी
सईने व्हाईट एम्ब्रॉयडरी असणारी सुंदर आणि डिझाईनर अशी ट्रान्सपरंट साडी नेसली आहे आणि तिची ही साडी कोणत्याही फॅशन शो वा एखाद्या पार्टीसाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तिच्या या साडीवर गुलाबाची एम्ब्रोयडरी करण्यात आली आहे आणि त्यासह गुलाबीची पानंही डिझाईन करण्यात आली आहेत. ही साडी पाहताच महिलावर्गाला नक्कीच आवडेल. सईने या साडीचा पदर एका बाजूला सोडला असून तिचा हा लुक खूपच मादक आणि क्लासी दिसून येत आहे. तिने ही स्टाईल अत्यंत सहजपणाने कॅरी केली आहे आणि त्यामुळेच तिचा हा लुक पटकन व्हायरल झालेला दिसून येतोय.
‘चांद तू नभातला…’; सई ताम्हणकरच्या निखळ सौंदर्यावर चाहत्याचा जडला जीव
स्ट्रेपलेस बॅकलेस ब्लाऊज
बॅकलेस ब्लाऊज स्टाईल
सईने या साडीसह व्हाईट रंगाचा स्ट्रेपलेस बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे आणि याचे परफेक्ट मॅच तिच्यावरून नजर हटू देत नाहीये. बॅकलेस ब्लाऊजला मागून केवळ नॉट्स असून एखाद्या कॉर्डसेटप्रमाणे त्याचे डिझाईन करण्यात आले आहे. सईचा हा लुक अत्यंत वेगळा असून तुम्ही नेहमीच्या स्टाईलला कंटाळला असाल तर सईचा हा लुक तुम्ही नक्कीच कॅरी करू शकता.
क्लासी बन स्टाईल
सईची वेगळी हेअरस्टाईल
सईने केसांचा बन केला असून वेव्ही स्टाईल केली आहे आणि त्यात गोल्डन रंगांच्या Accessories चा योग्य वापर केलाय. याशिवाय तिने रेट्रो स्टाईलप्रमाणे केसांमध्ये बेल्टदेखील लावला आहे आणि जो तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. तिचा हा लुक थोडासा रेट्रो स्टाईलचीही आठवण करून देत आहे. तिचा हेअरकलरही यामध्ये अधिक भर घालत असून लुकला उठाव देतोय
गोल्डन कानातले
सईची स्टेटमेंट ज्वेलरी
सईने या साडीसह जास्त दागिने घातलेले नाहीत मात्र केसांप्रमाणेच तिने कानातही त्याच डिझाईनच्या गोल्डनचा वापर केला आहे. जो क्लासी स्टाईल स्टेटमेंट दर्शवत आहे आणि सईच्या लुकला चारचाँद लावत आहे. तिचे गोल्डन कानातले अधिक आकर्षक दिसत असून अशा साड्यांसह योग्य मॅच होतील.
‘सई… तेरे चेहरे से मेरी आँखे हट नहीं रही’ Glamour म्हणजे काय? याचे उत्तम उदाहरण
न्यूड मेकअप लुक
सईचा लोभसवाणा मेकअप
हल्ली न्यूड मेकअप लुकचा जास्त बोलबाला आहे. सईनेदेखील याच न्यूड मेकअपचा आधार घेतला आहे. सईने फाऊंडेशन, हायलायटर, काजळ, स्मोकी आईज आयशॅडोचा वापर केला आहे. तसंच तिने न्यूड लिपस्टिक शेडचा वापर केला आहे. तिचा हा लुक साडीसह योग्य मॅच होतोय आणि तिच्या सौंदर्यात अधिक भर घालतोय.