मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या नव्या फोटोमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते. तसेच अभिनेत्रीने नुकतेच काही स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सईच्या नव्या फोटोमध्ये तिचा खास आणि विशेष अंदाज दिसत आहे. सई ताम्हणकर २०२५ वर्षात नुकतीच नवनवीन चित्रपटात तसेच हिंदी प्रोजेक्टमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसली आहे.
(फोटो सौजन्य - Instagram)
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकत्याच शेअर ताज्या फोटोमध्ये सुंदर आणि आकर्षित दिसत आहे. तसेच अभिनेत्रीने या शेअर केलेल्या फोटोमध्ये ब्लॅक अँड व्हाईट थीमची साडी नेसली आहे.
सईची साडी आणि तिचा संपूर्ण लुक हा दशकातील जगात घेऊन जात आहे. त्याच्या पांढऱ्या साडीवर सुंदर नक्षीदार काम केले आहे. तसेच काळ्या रंगाच्या ब्लाउसवर चमकती डिजाईन आहे.
सईने या सुंदर साडीवर खूप साधा आणि मोहक मेकअप निवडला आहे. ज्यामध्ये तिने जाड आयलायनर, गुलाबी लिपस्टिक आणि कपाळावर बारीक टिकली लावली आहे.
तसेच अभिनेत्रीने स्वतःचे काळे सिल्क केस बांधले आहे. आणि कानात मोठे पांढऱ्या रंगाचे इरिंग्स घातल्या आहेत. ज्यामुळे अभिनेत्रीचा संपूर्ण लुक परिपूर्ण झाला आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकरने हे फोटो शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिले आहे. आता अभिनेत्रीचे फोटो चाहत्यांना चांगलेच आवडले आहे आणि ते त्याला भरभरून कंमेंट करून प्रतिसाद देत आहे.