सोनालीला सहन करावा लागलेला मानसिक छळ, सिनेइंडस्ट्री सोडण्याची आलेली वेळ; 'तो' एक निर्णय आला कामी
मराठी सिनेविश्वात ‘अप्सरा’ म्हणून सोनाली कुलकर्णी हिने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच सोनाली सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह असते. ती कायमच स्टायलिश अंदाजातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. आई पंजाबी आणि वडिल मराठी असलेल्या सोनालीचा जन्म १८ मे १९८८ रोजी झाला. अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सोनालीने मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र इथपर्यंतचा तिचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.
सांगितीक मैफिल घडवणाऱ्या ‘अष्टपदी’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…
सौंदर्य, अदाकारी आणि नृत्यशैलीच्या माध्यमातून चर्चेत राहणाऱ्या सोनालीने ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले. त्यानंतर बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमधून तिने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. मात्र तिच्या आयुष्यात एक काळ असाही आला होता जेव्हा तिला ही फिल्म इंडस्ट्री सोडावीशी वाटत होती. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने या गोष्टीचा खुलासा केला होता.
‘आई तुळजाभवानी’चे कवडीमध्ये वास्तव्य, देवी कसा करणार असुरांचा नाश
मुलाखती दरम्यान, सोनाली कुलकर्णी म्हणाली की, “मला या परिस्थितीत कोणताच पर्याय सापडत नव्हता. पण मी माझे तत्व आणि विचार कुठेही मागे सोडणार नाही, या गोष्टीची मी काळजी घेतली होती.. मी माझा वेगळा प्रवास सुरु केला होता. मी माझं माझं स्ट्रगल सुरु केलं होतं. मी तेव्हा काही गोष्टींना नकार दिला होता, त्यामुळे मला ज्या चित्रपटांमध्ये काम करायचं होतं, त्या चित्रपटांमध्ये मला काम करता आलं नव्हतं. पण त्याच दरम्यान मी स्वत:चा मार्ग शोधला होता. दिग्दर्शकांना भेटले, निर्मात्यांना भेटले. हिरकणी चित्रपटात मी आधी स्वत:चे पैसे गुंतवले. पण मी जर असं केलं नसतं, तर मला कदाचित सिनेसृष्टी सोडावी लागली असती. ”
५५ सेकंद चित्तथरारक, ‘त्या’ घरातलं गुढ कसं उकलणार; ‘जारण’ चा टीझर पाहिला का?
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांना ‘माणिक रत्न’ पुरस्काराने सन्मानित
सोनालीच्या काही वाईट काळात त्या गाण्यावर नृत्य करण्यासाठीही रॉयल्टी म्हणून तिच्याकडे पैसे मागितले जाऊ लागले. याबाबत तिने भाष्य केले की, “मी या गोष्टीसाठी फार मेहनत घेतलीये, मी ज्या गोष्टीचा भाग होते, त्याच गोष्टीसाठी मी जेव्हा लोकांना नकार द्यायला लागले तेव्हा मला त्यासाठी पैसे मागितले जायचे, याचं कारण एकच होतं की समोरची व्यक्ती एका पोजिशनवर होती.”