'आता थांबायचं नाय' चित्रपट सोनाली कुलकर्णीला कसा वाटला? पोस्ट शेअर करत म्हणाली-"अत्यंत महत्त्वाचा विषय..."
सध्या शिवराज वायचळ दिग्दर्शित, ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. १ मे रोजी रिलीज झालेल्या ह्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवसह अनेक मराठमोळे सेलिब्रिटी आहेत. या चित्रपटामध्ये मराठी इंडस्ट्रीतील अनेक तगडे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे कथानक मुंबई महानगरपालिकेमध्ये, २०१६ साली घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे कौतुक अवघी मराठी इंडस्ट्री करतेय. गायक क्षितीज पटवर्धनने चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही चित्रपटाचे कौतुक केले.
विजय देवेराकोंडा अडकला अडचणीत, अभिनेत्यावर लेखी तक्रार दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत, चित्रपटाच्या दिग्दर्शकांसह कलाकारांचे कौतुक केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते की, “यंदाचा “महाराष्ट्र दिन” आणि “कामगार दिन” संपूर्णपणे सार्थकी ठरला. तपशील सांगायला खूप आहे पण दहावी, बारावी आणि पदवीधर परीक्षा वगैरे उत्तीर्ण केल्यानंतरही नेमके, थेट शब्द सापडत नाहीयेत. खऱ्या भावना व्यक्त करायला त्या इतक्या ओसंडून वाहताहेत की आता बोलून, लिहून त्या थांबवायच्या नाहीयेत. तरी त्या वाहणाऱ्या भावनांवर पुल म्हणून ही पोस्ट… मराठी चित्रपटसृष्टीचं भवितव्य उज्ज्वल आहे हे नक्की. दिग्दर्शक शिवराज वायचळ आणि ओमकार गोखले यांनी प्रेक्षकांना अत्यंत महत्त्वाचा विषय संवेदनशीलपणे समजून आणि समजावून मांडल्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमी. संहिता, संवाद, मांडणी, संगीत, छायाचित्रण, पार्श्वसंगीत, सगळ्याच बाजू चपखल जमल्या आहेत आणि सगळ्याच कलाकारांचा अभिनय हा अभिनय वाटतंच नाही. आपण या “characters” ची ही अत्यंत कमालीची गोष्ट पाहतोय असं वाटत राहतं… P.S. हा मराठी चित्रपट “चित्रपटगृहात” सहकुटुंब पाहायलाच हवा… ही आपली “नैतिक” जबाबदारी आहे… त्यातून चित्रपट पाहिल्यावर आपल्या “नागरिक” म्हणून आपल्या अश्या अनेक जबाबदाऱ्यांची जाणीवही नक्कीच होईल. ”
मुंबई महानगरपालिकेचे कामगार आणि त्यांच्या असंख्य मूक वेदनांना आवाज फोडणारा हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. नापास असलेले महानगरपालिकेचे कर्मचारी दहावीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वायचळ यांनी रंजकतेने पडद्यावर मांडला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक शिवराज वायचळ असून चित्रपटात मुख्य भूमिकेत भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर आणि प्राजक्ता हनमघर यांसारखी तगडी स्टारकास्ट मुख्य भूमिकेत आहे.