(फोटो सौजन्य - x अकाउंट)
अभिनेता विजय अडचणीत अडकला आहे. त्याच्यावर आदिवासी समुदायाचा अपमान केल्याचा आणि त्याबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलल्याचा आरोप आहे. २६ एप्रिल रोजी हैदराबादमध्ये ‘रेट्रो’ चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमादरम्यान अभिनेत्याने आदिवासी समुदायाबद्दल केलेल्या टिप्पण्यांशी संबंधित हे प्रकरण आहे. आता या प्रकरणात, बापूनगर येथील आदिवासी वकील संघटनेचे अध्यक्ष किशनराज चौहान यांनी देवेराकोंडा यांच्यावर कार्यक्रमात आदिवासींबद्दल अपमानास्पद बोलल्याचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली आहे.
कायदेशीर कारवाईची मागणी
हैदराबादमधील संजीव रेड्डी नगर पोलिस ठाण्यात विजय देवेराकोंडा यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आदिवासी संघटनांनी या प्रकरणात अभिनेत्याने तात्काळ माफी मागावी अशी मागणी केली आहे. आदिवासी वकील संघटनेच्या वतीने दाखल केलेल्या तक्रारीत किशनराज चौहान म्हणाले, “हा केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न नाही. हा उपेक्षित समुदायांच्या प्रतिष्ठेचा आणि संवैधानिक संरक्षणाचा प्रश्न आहे. आम्ही अनुसूचित जाती/जमाती अत्याचार कायद्यांतर्गत अभिनेत्याविरुद्ध त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करतो.”
హీరో విజయ్ దేవరకొండపై ఎస్సీ ఎస్టీ అట్రాసిటీ కేసు నమోదు చేయాలని ఫిర్యాదు
ఏప్రిల్ 26వ తేదీన రెట్రో సినిమా ప్రీ రిలీజ్ ఈవెంట్లో ‘500 ఏళ్ల కింద ట్రైబల్స్ కొట్టుకున్నట్టు పాకిస్తాన్ వాళ్ళు బుద్ధి లేకుండా చేసే పనులు ఇవి’ అంటూ వ్యాక్యాలు చేసిన విజయ్ దేవరకొండ
గిరిజన జాతిని అవమాన… pic.twitter.com/WoSGXl01Qm
— Telugu Scribe (@TeluguScribe) May 2, 2025
तक्रारीत पुढे म्हटले आहे की विजयने हे विधान मुख्य प्रवाहातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या उपस्थितीत केले होते आणि ते ऑनलाइन मोठ्या प्रमाणात प्रसारित केले गेले होते. तक्रारीत विजय देवरकोंडा यांचे विधान असलेल्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट आणि लिंक्स देखील सादर करण्यात आल्या आहेत. हा व्हायरल होत असलेल्या तक्रारीचा एक भाग आहे.
R Madhavan चं NCERT च्या अभ्यासक्रमावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित, हिंदू-बौद्ध धर्मावरही केले भाष्य…
काय म्हणाले विजय देवराकोंडा?
रेट्रोच्या प्री-रिलीज कार्यक्रमात विजय देवरकोंडा यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केले. दरम्यान, अभिनेता म्हणाला होता की, “काश्मीरमध्ये जे घडत आहे त्यावर उपाय म्हणजे दहशतवाद्यांना शिक्षित करणे आणि त्यांचे ब्रेनवॉशिंग होऊ नये याची खात्री करणे. काश्मीर भारताचा आहे आणि काश्मिरी आपले आहेत. भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्याचीही गरज नाही कारण पाकिस्तानी स्वतः त्यांच्या सरकारला कंटाळले आहेत आणि जर हे असेच चालू राहिले तर ते त्यांच्यावर हल्ला करतील. ते ५०० वर्षांपूर्वीच्या आदिवासींसारखे वागतात, कोणत्याही अर्थाशिवाय लढत आहेत.” असं अभिनेता म्हणाला.