पूजा बिरारीसह लवकरच सोहम बांदेकर बांधणार लग्नगाठ (फोटो सौजन्य - Instagram)
महाराष्ट्रातील तमाम वहिनींचे लाडके भाऊजी आता लवकरच खऱ्या आयुष्यात सासरे होणार आहेत. मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकरांचा मुलगा सोहम लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राजश्री मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री पूजा बिरारीसह लग्न करणार असल्याचं वृत्त विश्वसनीय सुत्रांकडून मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र बांदेकर कुटुंबीयांकडून याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.
सोहमने ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केले असून ‘बाईपण भारी देवा’मध्येही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर पूजा बिरारी ‘येड लागलं प्रेमाचं’ मध्ये मंजिरी नावाची भूमिका साकारत आहे आणि मराठी मालिकांमध्ये ही मालिका सध्या गाजत आहे. दोघेही आपल्या कामापेक्षा आता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत.
लवकरच अडकणार लग्नबंधनात
आदेश आणि सुचित्रा यांचा लाडका मुलगा सोहम लवकरच पूजा बिरारीसह लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त ‘राजश्री मराठी’ने दिलं आहे. आपल्या आवडत्या जोडीचा मुलगा लग्नबोहल्यावर चढणार म्हटल्यावर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. मात्र यापैकी कोणीही याबाबत दुजोरा दिला नाहीये. ही केवळ अफवा आहे की खरंच सोहम आणि पूजा लग्न करणार का याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
कोण आहे सोहम बांदेकर
सोहम बांदेकर हा आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा असून तोदेखील सध्या मालिका आणि चित्रपटांमधून काम करत आहे. अजूनही तो पूर्णतः एस्टॅब्लिश नसला तरीही त्याने आपली छाप सोडली आहे. स्टार प्रवाहच्या ‘नवे लक्ष्य’ मधून त्याने पदार्पण केले आणि पोलिसांच्या भूमिकेत तो गाजला. तसंच त्याने आतापर्यंत केवळ एकाच चित्रपटात काम केले असून मनोरंजन विश्वास स्वतःचा जम बसवत आहे.
कोण आहे पूजा बिरारी
पूजा बिरारी मराठी अभिनेत्री असून ती सध्या स्टार प्रवाहच्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून मंजिरी ही भूमिका साकारत आहे. तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि तिने अनेक सौंदर्य स्पर्धा कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. २०१९ मध्ये, तिने “साजना” मासिकाद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. पूजाने २०१८ मध्ये मिस पुणे प्राइड टायटल जिंकले. पूजाचा जन्म पुणे, महाराष्ट्र, भारत येथे झाला. सध्या ती मुंबईत राहत असून तिने तिचे शिक्षण पुण्यातील मार इव्हानिओस कॉन्व्हेंट स्कूलमधून घेतले असल्याचे सांगण्यात येते. तसंच तिने फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथून कौन्सिल पूर्ण केली. जाने २०१९ मध्ये झी युवा वाहिनीच्या “साजना” या मराठी मालिकातून टेलिव्हिजन जगात प्रवेश केला. त्यानंतर ती २०२० मध्ये सुफळ संपूर्ण मध्ये दिसली आणि सध्या मंजिरीच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मन जिंकताना दिसत आहे.