Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१०० व्या नाट्यसंमेलनातील नाट्य महोत्सवाची सांगता, नाट्यरसिकांनी घेतला वेगवेगळ्या नाटकांचा आस्वाद

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचा सांगता सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी अ‍ॅड आशिष शेलार आणि विकास खारगे उपस्थित होते.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 03, 2025 | 02:12 PM
१०० व्या नाट्यसंमेलनातील नाट्य महोत्सवाची सांगता, नाट्यरसिकांनी घेतला वेगवेगळ्या नाटकांचा आस्वाद

१०० व्या नाट्यसंमेलनातील नाट्य महोत्सवाची सांगता, नाट्यरसिकांनी घेतला वेगवेगळ्या नाटकांचा आस्वाद

Follow Us
Close
Follow Us:

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचा सांगता सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी अ‍ॅड आशिष शेलार (सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), विकास खारगे (मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग) उपस्थित होते. बंगाली, तामिळ, इंग्रजी, मराठी अशा बहुभाषिक नाटकांचा आस्वाद नाट्यरसिकांना या विशेष नाट्य महोत्सवात घेता आला.

स्टारकिड असूनही कॉफी शॉपमध्ये काम करायची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, आज गाजवतेय बॉलिवूड इंडस्ट्री

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने अजित भुरे (प्रमुख कार्यवाह) यांच्या हस्ते आशिष शेलार आणि विकास खारगे यांचा मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना, विकास खारगे म्हणाले, ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने १०० व्या नाट्य संमेलनाद्वारे आयोजित केलेला हा नाट्यजागर खरोखरीच खूप स्तुत्य आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाटकं पोहोचवण्यासाठी एक/दोन दिवस नाही तर तब्बल वर्षभर राज्यभरात आयोजित नाट्य उपक्रमांतून नाटकाविषयी जनजागृती घडवण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य नाट्यपरिषदेने केलं आहे, त्याबद्दल मी परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. नवोदित कलाकारांना आणि रसिकांनासुद्धा नाट्यपरंपरा आणि नाटकांच्या विविध प्रकारांची माहिती व्हावी यासाठी घेतलेली मेहनत स्तुत्य आहे. आपली नाट्यसंस्कृती अव्याहतपणे विकसित व्हावी यासाठी सांस्कृतिक विभागाद्वारे मी कायम नाट्य परिषदेच्या पाठीशी उभा राहीन याची खात्री देतो.”

सुशीला – सुजीत मध्ये अमृताच्या नृत्याची दिसणार झलक, पहिल्यांदाच करणार आइटम साँग!

तर आशिष शेलार यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शताब्दी निमित्त आज आपण सगळे जमलो आहोत. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही अशा एखाद्या मोठ्या संस्कृतीची शंभरी होते आणि ती साजरी केली जाते ही कल्पनाच खूप सुखावह आहे. विष्णुदास भावे यांनी सादर केलेल्या पहिल्या रचनेपासून ते आजपर्यंत अशी नाट्यसंस्कृतीची शंभर वर्ष आपण मानत आलो आहोत. परंतु अनेक पुरावे आणि दावे सांगतात, आपली नाट्यपरंपरा खूप आधीपासून असंख्य लोककलांमधून मांडली गेलेली आहे. याचं खोलात जाऊन संशोधन व्हायला हवं. सत्य पडताळणं गरजेचं आहे कारण आपल्याला हे जगाला सांगता आलं पाहिजे की Freedom of expression तुम्ही नंतर आणलं असेल पण हे कलेचे स्वातंत्र्य इतरांच्या विचारात ही नसेल तेव्हापासून आपल्या गावांत आहे. नाट्यसंस्कृतीची परंपरा यावर शोधप्रबंध होणे गरजेचे आहे, मी खारगे साहेबांच्या संमतीने इथे सूचित करू इच्छितो, विशेषज्ञांची एक समिती नेमावी, त्यासाठी लागणारा सर्व खर्च राज्यसरकार नक्की करेल याची मी खात्री देतो. शिवाय मी नाट्य परिषदेचे सुद्धा अभिनंदन करतो या शताब्दी महोत्सवादरम्यान वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भाषा हे संवादाचं माध्यम आहे आणि नाट्य परिषदेने बहुभाषिक नाट्यकलेला महत्त्व दिले हे फारच स्पृहणीय आहे.”

‘…यांना देशाबाहेर काढा’, रणवीर अलाहबादिया- समय रैना प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्याचे वक्तव्य

सांगता सोहळ्यावेळी ‘चिनाब से रावी तक’, ‘१४ इंचाचा वनवास’, ‘अविघ्नेया’ या नाट्यकृतींचा आस्वाद रसिकांनी घेतला. कार्यक्रमाच्या अखेरीस नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी उपस्थित मान्यवर आणि रसिकांचे आभार मानत हा नाट्यमहोत्सव इतक्या मोठ्या संख्येने नावाजला गेल्याबद्दल आभार मानत रसिक मायबाप प्रेक्षकांप्रती कृतज्ञता यावेळी व्यक्त केली.

संमेलनाध्यक्ष डॉ जब्बार पटेल यांच्या संकल्पवर आधारील दिनांक 20 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या या नाट्य सोहळ्यात बंगाली, तमिळ, हिंदी, मराठी भाषांतील नाटके, दीर्घांक, संमेलनानिमित्त घेण्याच आलेले नाट्यजागर स्पर्धेतील विजेत्या एकांकिका, बालनाट्य, नाट्यवाचन, एकपात्री, नाट्यछटा, नाट्य परिषद शाखेचे कार्यक्रम इत्यादि कार्यक्रम सादर करण्यात आले.

Web Title: Adv ashish shelar in akhil bhartiya marathi natya parishad conclusion of the theater festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

“डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र…”; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?
1

“डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र…”; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?

मंत्री आशिष शेलार यांच्या नव्या घोषणेने महाराष्ट्रातील सिनेमा व्यवसायावर मोठा परिणाम होणार
2

मंत्री आशिष शेलार यांच्या नव्या घोषणेने महाराष्ट्रातील सिनेमा व्यवसायावर मोठा परिणाम होणार

BJP Politics: भाजपची तिरपी चाल…;आशिष शेलारांना हटवून अमित साटम यांच्याकडे मुंबई शहर अध्यक्षपदाची सुत्रे
3

BJP Politics: भाजपची तिरपी चाल…;आशिष शेलारांना हटवून अमित साटम यांच्याकडे मुंबई शहर अध्यक्षपदाची सुत्रे

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
4

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.