बॅालिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांचा ‘कल्कि 2898 एडी’ (Kalki 2898 AD) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील त्यांचा लूक सध्या व्हायरल झाला आहे. या चित्रपटात ते अश्वथामाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहत्यांना त्यांचा हा लूक आवडला असून आता चित्रपट रिलीज होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. सध्या अमिताभ बच्चन हे पुन्हा चर्चेत आले आहेत, ते त्यांच्या सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे. अयोध्येनंतर अमिताभ बच्चन यांनी आता अलिबागमध्ये प्रॉपर्टी विकत घेतली आहे.
[read_also content=”सलमान खानच्या घराबाहेरी गोळीबार प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश, तापी नदीतून एक बंदूक केली जप्त! https://www.navarashtra.com/movies/salman-khan-house-firing-case-crime-branch-recovered-a-gun-and-some-live-cartridges-deets-from-tapi-river-nrps-526406.html”]
अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये खरेदी केली जमीन
अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी अयोध्येत प्रॉपर्टी विकत घेतली होती. आता त्यांनी अलिबागमध्ये ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’मध्ये (HOABL) 10 कोटी रुपये खर्च करत 10,000 स्क्वेअर फूट जमीन खरेदी केली असून त्याची किंमत 14.5 कोटी आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांची ही प्रॉपर्टी 20 एकरमध्ये पसरलेली आहे. एप्रिल 2023 मध्ये ही प्रॉपर्टी लॉन्च करण्यात आली होती. नव्या प्रॉपर्टीबद्दल अमिताभ बच्चन यांनी अद्याप चाहत्यांना काहीही माहिती दिलेली नाही. अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी अलिबागमध्ये प्रॉपर्टी विकत घेतली आहे. काही दिवसापुर्वी अभिनेता शाहरुख खानची लेक सुहााहा खाननेही अलीबागमध्ये प्रॅापर्टी विकत घेतली होती.
अमिताभ बच्चन यांचं वर्कफ्रंट
अमिताभ बच्चन हे लवकच कल्कि 2898 एडी चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहतेत. रिपोर्टनुसुार सकल्की 2898 एडीसाठी बिग बींनी सुमारे 18 कोटी रुपये आकारले आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत साऊथचा सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत आहे. तर दीपिका पदुकोण, कमल हसन आणि दिशा पटानीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सर्वांची गणना चित्रपटसृष्टीतील महागड्या स्टार्समध्ये केली जाते.
Web Title: After ayodhya actir amitabh bacchan purchase property in alibag nrps