फोटो सौजन्य - सोशल मीडिया
नतासा स्टॅनकोविकचा म्युझिक व्हिडिओ : हार्दिक पांड्याने काल झालेल्या सामन्यात कमालीची कामगिरी करत बांग्लादेशविरुद्ध एकतर्फी विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने विश्वचषकामध्ये कमालीची कामगिरी केली होती. त्यानंतर त्याने भारतामध्ये येऊन त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबत घटस्फोटाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा तिच्या मुलासोबत भारतामध्ये बाहेर राहत होती. बऱ्याच महिन्यानंतर नताशा आता पुन्हा भारतामध्ये परतली आहे, त्याचबरोबर ती तिच्या कामावर सुद्धा परतली आहे. हार्दिकपासून वेगळे झाल्यानंतर नताशाने आता तिच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.
नतासा स्टॅनकोविक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते, आता तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आता नताशा लवकरच एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तेरे करके असे त्याच्या या व्हिडिओचे नाव आहे. पोस्टरमध्ये ती गायक प्रीत इंदरसोबत दिसत आहे. नताशाचा लूक लोकांना खूप आवडला आहे. शेअर करताना नताशा पोस्टरमध्ये दिसत असून तिने लिहिले – तेरे करकेच्या तालावर नाचण्यासाठी तयार व्हा. उद्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. बऱ्याच दिवसांनी नताशाला म्युझिक व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
नताशाच्या पोस्टवर लोक खूप कमेंट करत आहेत की ती मुलासाठी काम करत आहे . एका यूजरने लिहिले – ती आता तिच्या मुलासाठी काम करत आहे. मजबूत बाई. तर दुसऱ्याने लिहिले – मेहनती आई. खूप खूप अभिनंदन. डोलत रहा. एकाने लिहिले- नताशा, तुला इंडस्ट्रीत परत पाहून आनंद झाला. नताशाच्या पोस्टवर कुणालने दिलेली प्रतिक्रिया , हार्दिक पंड्याचा भाऊ कुणालच्या या कमेंटकडे लोकांचे लक्ष लागले आहे. कुणालने नताशाच्या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट केला. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, नताशाला आता तिच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचे आहे आणि त्यामुळेच ती भारतात परतली आहे.