Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की…”; पहलगाम हल्ल्यावर अक्षय कुमारचा संताप अनावर, Video Viral

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही त्याचा संताप व्यक्त केला. 'केसरी २'च्या स्क्रीनिंगदरम्यान समोर अनेक प्रेक्षक उपस्थित होते. त्यांच्या सर्वांसमोर अभिनेत्याने राग व्यक्त केला.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 27, 2025 | 04:34 PM
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; पहलगाम हल्ल्यावर अक्षय कुमारचा संताप अनावर, Video Viral

"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; पहलगाम हल्ल्यावर अक्षय कुमारचा संताप अनावर, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

करण सिंग त्यागी दिग्दर्शित ‘केसरी २’ चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १८ एप्रिल २०२५ रोजी रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करणाऱ्या ह्या चित्रपटाने ९ दिवसांत ५७ कोटींची कमाई केली आहे. अलीकडेच, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आपल्या आगामी चित्रपट ‘केसरी २’च्या (kesari 2) स्क्रीनिंगदरम्यान जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. या हल्ल्याचे पडसाद फक्त भाारतातच नाही इतरत्र देशांतही पडताना दिसत आहे. आता अशातच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही त्याचा संताप व्यक्त केला. ‘केसरी २’च्या स्क्रीनिंगदरम्यान समोर अनेक प्रेक्षक उपस्थित होते. त्यांच्या सर्वांसमोर अभिनेत्याने राग व्यक्त केला.

सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरचं निधन, २५ व्या वाढदिवसाच्या २ दिवसाआधीच घेतला जगाचा निरोप

अक्षय कुमार आणि अनन्या पांडे स्टारर ‘केसरी २’ चित्रपट हा जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे. चित्रपटामध्ये अक्षयने सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारलीये. त्याच्या भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून शिवाय चाहते अक्षयच्या अभिनय कौशल्याचेही कौतुक करीत आहेत. दरम्यान, चित्रपटात एक असा सीन आहे, ज्यामध्ये जनरल रेझिनाल्ड डायर शंकरन यांना ब्रिटिशांचा गुलाम म्हणतो. त्यावेळी सी. शंकरन नायर यांनी जनरल डायरला दिलेल्या उत्तराची सर्वत्रच जोरदार चर्चा होत आहे. सी शंकरन म्हणतात की, “F**K You…” आता हेच उत्तर अक्षयने आपल्या चाहत्यांच्या तोंडून दहशतवाद्यांसाठी बोलून घेतले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काल (२६ एप्रिल) अक्षय कुमार ‘केसरी २’च्या मुंबईतील एका थिएटरमधील स्क्रीनिंगदरम्यान चाहत्यांना सरप्राइज देण्यासाठी पोहोचला होता.

 

पाकिस्तानमधील पाणी बंदीवर संतापली Hania Aamir, म्हणाली ‘माझे हृदय तुटते…’

थिएटरला भेट दिली तेव्हा अक्षयने सर्व चाहत्यांसोबत संवाद साधला. चाहत्यांसोबत संवाद साधताना अभिनेता म्हणाला की, “तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे, जेव्हा मी ‘केसरी २’ चित्रपट करत होतो त्यावेळी प्रत्येक सीन करताना मी आणि दिग्दर्शक विचार करत असायचो की, जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सगळ्यांच्या मनात किती राग आणि संताप निर्माण झाला असेल. तोच राग आणि संताप पुन्हा जागा झाला आहे. मी कशाबद्दल बोलतोय ते तुम्हाला कळलंच असेल. आजही आपण त्या दहशतवाद्यांना एक गोष्ट सांगितली पाहिजे, जे मी चित्रपटात म्हटलं आहे. ते काय?” त्यानंतर उपस्थित असलेले सर्वजण ओरडू लागले, “F**K You….” अक्षय कुमारच्या याच व्हायरल व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, ‘केसरी चॅप्टर २’ भारतासह ऑस्ट्रेलिया, जर्मनी, मलेशिया, न्यूझीलंड, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्समध्येही प्रदर्शित झाला. या चित्रपटाने अमेरिकेत चांगली कामगिरी केली आहे. अमेरिकेत आतापर्यंत ७ कोटींची कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘केसरी चॅप्टर २’ने पहिल्या सहा दिवसांत जगभरात ६४ कोटी रुपये कमावले आहेत.

Web Title: Akshay kumar pahalgam terror attack reaction kesari chapter 2 screening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 04:34 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Akshay Kumar movie
  • Bollywood
  • bollywood movies
  • Bollywood News
  • Pahalgham Terror Attack

संबंधित बातम्या

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
1

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
2

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
3

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
4

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.