(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
एका सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरचं निधन झालं आहे. त्या सोशल मीडिया इन्फ्लून्सरच्या निधनाचे वृत्त ऐकून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. २५ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर मिशा अग्रवाल हिचे वयाच्या २५ व्या वर्षी निधन झाले आहे. मिशाचा काल (२६ एप्रिल रोजी) वाढदिवस होता. पण वाढदिवसाच्या दोन दिवस आधी तिने या जगाचा निरोप घेतला. मीशाच्या निधनाचे वृत्त तिच्या कुटुंबियांनी इन्स्टाग्रामवर अधिकृत पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांसोबत निधनाचे वृत्त शेअर केले आहे.
मीशा अग्रवालच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन तिच्या कुटुंबीयांनी निधनाचे वृत्त दिले. शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिण्यात आले की, “आम्ही जड अंतःकरणाने तुम्हाला एक दु:खद बातमी सांगत आहोत. आमची लाडकी मिशा आता आपल्यामध्ये राहिली नाही. तुम्ही तिला दिलेल्या सर्व प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही मनापासून तुमचे आभारी आहोत. आम्ही अजूनही यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. कृपया तिला तुमच्या आठवणींमध्ये जिवंत ठेवा आणि तिच्यासाठी प्रार्थना करा,” असं मिशाच्या अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. दरम्यान, मीशाच्या कुटुंबीयांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचं नेमकं निधन कसं झालं ? याबद्दल माहिती दिलेली नाही. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरच्या निधनाचे कारण गुलदस्त्यातच आहे.
पाकिस्तानमधील पाणी बंदीवर संतापली Hania Aamir, म्हणाली ‘माझे हृदय तुटते…’
मिशाच्या निधनाचे वृत्त ऐकून चाहत्यांसह तिच्या सेलिब्रिटी मित्रांवरही दु: खाचा डोंगर कोसळला आहे. सुरुवातीला तर अनेकांना तिच्या निधनाच्या वृत्तावर विश्वास बसला नव्हता. काहींना वाटलं की ही पोस्ट फेक आहे, अशी कमेंटही त्यांनी केली होती. मीशाच्या निधनाचे बातमी खरी नाही, अशी कमेंटही अनेक चाहत्यांनी केली होती.. मात्र तिच्या कुटुंबियांनी तिच्या निधनाचे वृत्त दिल्यानंतर सोशल मीडियावर शोककळा पसरली. फॅन्स- फॉलोअर्सने मिशाला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, “मला आशा आहे की ही बातमी खोटी आहे, ती खूप सुंदर आणि खूप टॅलेंटेड होती. तिच्या कुटुंबीयांना, मित्रमंडळीला आणि तिच्या चाहत्यांनाही या दु:खातून सावरण्यासाठी देव बळ देवो.” तर आणखीने लिहिले की, “अजूनही विश्वास बसत नाहीये की मीशाचे निधन झाले आहे… ती खूप चांगली होती.”