Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“एक्सपीरियन्स द एक्स्ट्राऑर्डिनरी!” अल्लू अर्जुनने दिले पुढील मोठ्या प्रोजेक्टचे संकेत?

नॅशनल अवॉर्ड विजेता अल्लू अर्जुन आज खऱ्या अर्थाने पॅन-इंडिया स्टार बनला आहे. पुष्पा 2: द रूल नंतर त्याचा पुढचा प्रोजेक्ट कोणता, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 08, 2026 | 05:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • खऱ्या अर्थाने पॅन-इंडिया स्टार बनला
  • पॅन-इंडिया प्रोजेक्टची पहिली झलक
  • चाहत्यांची उत्सुक नजर लागून
नॅशनल अवॉर्ड विजेता आणि ‘आयकॉन स्टार’ म्हणून ओळखला जाणारा अल्लू अर्जुन हा सध्या भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. आपल्या स्टाईल, अभिनय आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्समुळे तो प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. दक्षिण भारतीय सिनेसृष्टीपुरताच मर्यादित न राहता, तो आज खऱ्या अर्थाने पॅन-इंडिया स्टार बनला आहे. पुष्पा 2: द रूलच्या यशानंतर आता त्याचा पुढचा प्रोजेक्ट कोणता? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

‘आमचा कोणताही प्लॅन नव्हता…’ लग्नाच्या एक वर्षानंतर ‘बालिका वधू’ने शेअर केली Good News? अभिनेत्रीने स्वतःच दिली हिंट

अशातच अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक खास GIF शेअर केला असून, त्यात तो ब्लॅक रंगाच्या स्टायलिश आउटफिटमध्ये अत्यंत प्रभावी दिसतो. कॅमेरा मागून पुढे येत त्याच्याकडे फिरतो आणि समोर असलेल्या एका भव्य गेटवर “Experience the Extraordinary” असे शब्द झळकतात. हे दृश्य पाहताच चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली असून, हा नेमका कशाचा संकेत आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

या पोस्टसोबत अल्लू अर्जुनने दिलेले कॅप्शनही तितकेच रहस्यमय आहे. कोणतेही थेट स्पष्टीकरण न देता, त्याने केवळ उत्सुकता वाढवणारे शब्द वापरले आहेत. त्यामुळे हा आगामी चित्रपटाचा टीझर आहे की एखाद्या भव्य पॅन-इंडिया प्रोजेक्टची पहिली झलक, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. काही चाहते हा दिग्दर्शक अ‍ॅटलीसोबतच्या संभाव्य बिग बजेट चित्रपटाचा इशारा असल्याचे म्हणत आहेत, तर काहींच्या मते हा पूर्णपणे वेगळ्या धाटणीचा प्रयोग असू शकतो. दरम्यान, बॉक्स ऑफिसवरही अल्लू अर्जुनचे वर्चस्व कायम आहे. पुष्पा 2: द रूल या चित्रपटाने जगभरात सुमारे ₹1800 कोटींची लाइफटाइम कमाई करत नवा इतिहास रचला आहे. हा आकडा सध्या तरी कोणत्याही चित्रपटाला मोडता आलेला नाही. त्यामुळे अल्लू अर्जुन केवळ स्टारडमच्या नव्हे, तर बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीतही अव्वल स्थानावर आहे. हा विक्रम भविष्यात कोण मोडणार, याकडेही चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

अल्लू अर्जुन नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी वेगळं आणि मोठं घेऊन येतो. त्यामुळे “Experience the Extraordinary” हा फक्त एक डायलॉग नसून, त्याच्या पुढील प्रवासाचा संकेत असण्याची शक्यता अधिक आहे. भव्य स्केल, नवे प्रयोग, दमदार कथा आणि त्याची खास स्टाईल हे सगळं एकत्र आलं, तर प्रेक्षकांसाठी तो अनुभव खरंच ‘एक्स्ट्राऑर्डिनरी’ ठरेल.

लग्नानंतर पहिल्यांदाच ‘चीकाटीलो’ चित्रपटात झळकणार शोभिता धुलिपाला; साकारणार अनोखी भूमिका

आता अल्लू अर्जुन नेमकं काय घेऊन येणार, याची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे चाहत्यांची उत्सुक नजर लागून आहे. मात्र एक गोष्ट नक्की आयकॉन स्टारचा पुढचा प्रोजेक्ट मोठ्या पडद्यावर आला, तर तो भव्य, दमदार आणि चर्चेत राहणारा असणार, यात शंका नाही.

Web Title: Allu arjun shared hint of his big project experience the extraordinary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Allu Arjun

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.