फोटो सौजन्य - Social Media
गेल्या अनेक महिन्यांपासून अनन्या पांडेची नवीन वेब सिरीज ‘कॉल मी बे’ प्रेक्षकांच्या प्रतिक्षेला कारणीभूत होती. अनन्या पांडेच्या चाहत्यांना ‘कॉल मी बे’ या वेब सिरीजची प्रदर्शनाची तारीख जाणून घेण्यात मोठी उत्सुकता होती. चाहत्यांच्या या प्रतिक्षेस पूर्णविराम लागला आहे. कारण अनन्या पांडेची नवी कोरी पण चर्चेत रंगलेली वेब सिरीज ‘कॉल मी बे’चा ट्रेलर लाँच झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे सिरीजला रिलीज करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
‘कॉल मी बे’ सप्टेंबरच्या ६ तारखेला प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना ही वेब सिरीज अमेझॉन प्राईमवर पाहता येणार आहे. या वेब सिरीजमध्ये अनन्या पांडेसह अनेक स्टारकास्ट दिसून येणार आहेत. या सिरीजमध्ये वीर दास, गुरफतेह पीरजादा, वरुण सूद, मिनी माथुर यांनी देखील भूमिका निभावली आहे. कोलिन डी कुन्हाद्वारे दिग्दर्शित या वेब सिरीजला चांगलाच प्रतिसाद मिळणार असल्याचा प्रतिसाद प्रेक्षकांच्या प्रतिक्षेवरून तसेच सीरिजच्या कॉन्सेप्ट वरून लक्षात येत आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी कॉमेंट्समध्ये चांगला प्रतिसाद दिला आहे. जे सिरीज तसेच अनन्या पांडेच्या लोकप्रियेतेची साक्ष देते.
हे सुद्धा वाचा : ‘तू पण भवऱ्यासारखी फिरतेय’, अभिजीतमुळे अरबाज आणि निक्कीमध्ये वाद!
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने ‘कॉल मी बे’ वेब सिरीजची निर्मिती केली आहे. या सिरीजमध्ये अनन्या पांडे एका गडगंज श्रीमंत घरातील मुलगी दाखवली असून अगदी राजकुमारीसारखी तिची जीवनशैली दाखवली आहे. परंतु, अचानक काही कारणाने तिला तिच्या लग्जरीयस जीवनशैलीपासून लांब होऊन मुंबईला जाऊन स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी काम करावे लागते. तिची ही कथा जाणून घेण्यासाठी प्रेक्षकवर्ग आतुर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यूट्यूबवर कॉल मी बे’ वेब सिरीजचा ट्रेलर लाँच केला गेला असून. ट्रेलर फार मजेदार असल्याचे दिसून येत आहे. एका श्रीमंत घरातील एकदम क्लासी अंदाज असलेल्या मुलीची भूमिका अनन्या पांडेने साकारली आहे. ऐशो आरामात जगणारी मुलगी का मुंबईच्या रस्त्यावर मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलीसारखे कष्ट करण्यास धावपळ करते? मोठ्या गाड्यांमध्ये फिरणारी मुलगी का मुंबईत ऑटोने प्रवास करण्यास सुरुवात करते? अशी अनेक प्रश्न ये ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण केली आहे. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाल्याचे दिसून येत आहे.