‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’, ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे! ’ या नव्या शोनंतर ‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असतानाच आता ‘अंतरपाट’ ही आणखी एक नवीन मालिका रसिकांच्या भेटीला आली आहे.
[read_also content=”मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीनं तुरुंगात आत्महत्येचा केला प्रयत्न, प्रकृती गंभीर! https://www.navarashtra.com/movies/one-of-four-accused-in-salman-khan-house-firing-case-attempted-suicide-in-prison-nrps-528909.html”]
नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून, त्यात हळदीचा समारंभ सुरू असल्याचे दिसतेय. उल्हासित, आनंदी वातावरण, लग्नाची लगबग, सजलेले घर, पाहुण्यांचा वावर दिसत आहे. लव्ह मॅरेजच्या काळात अरेन्ज मॅरेज करणाऱ्या गौतमीला परफेक्ट जोडीदार मिळाल्याने ती अतिशय आनंदी आहे. गौतमीला आपल्या जोडीदारासोबत प्रत्येक स्वप्नं पूर्ण करायचे आहे. प्रोमोमध्ये आपल्याला मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीसही दिसत असून ती नवऱ्याच्या म्हणजेच क्षितीजच्या बाजुने आहे. गौतमीला वाटतेय की, क्षितिज हा सर्वोत्तम आणि परिपूर्ण असा नवरा आहे, जसा तिला हवा होता, अगदी तसा. पण खरंच क्षितिज या लग्नाने खुश आहे का? काय लिहिले आहे गौतमीच्या नशिबात? नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने आणला दुराव्याचा अंतरपाट!
‘अंतरपाट’ या मालिकेत अशोक ढगे, रश्मी अनपट, रेशम टिपणीस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही गोष्ट नेमकी काय असणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.