कोण होणार अर्चना पूरण सिंहची सून (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये जजच्या खुर्चीवर बसून हसणारी अर्चना पूरण सिंग तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. तिला आर्यमन सेठी आणि आयुष्मान सेठी अशी दोन मुले आहेत. मोठा मुलगा आर्यमन स्वतःचा यूट्यूब चॅनल चालवतो त्याचे अनेक चांगले चाहते आहेत. अलीकडील व्लॉगमध्ये, आर्यमनने त्याच्या आयुष्यातली खास व्यक्ती कोण आहे ते सांगितले आहे आणि सर्वांना सुखद धक्का बसला आहे.
अर्चना पूरण सिंगचा मोठा मुलगा आर्यमन सेठी ‘द केरला स्टोरी’ मधील अभिनेत्री योगिता बिहानीला डेट करत आहे. योगिता आणि आर्यमन यांच्यात डेटिंगच्या अफवा पहिल्यांदाच तिच्या ‘छोटी बातें’ या म्युझिक व्हिडिओमध्ये ते एकत्र दिसले तेव्हाच सुरू झाल्या होत्या आणि आता आर्यमन आणि योगिताने स्वतः यूट्यूब व्लॉगद्वारे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
नात्याची घोषणा करताना नर्व्हस
नुकताच आर्यमनने व्लॉग अपडेट केला आणि त्यामध्ये हैदराबाद मध्ये शूटिंग करत असलेल्या योगिताला सरप्राईज द्यायला तो पोहचला होता. आर्यमनने योगिताला सरप्राईज दिले आणि हॉटेलच्या लॉबीमध्ये आर्यमन तिच्यासाठी बुके घेऊन उभा असलेला पाहून ती खूपच भावनिक झाल्याचेही दिसून येत आहे.
यानंतर दोघांनीही कॅमेऱ्यासमोर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि नात्याबाबत खुलासा केला आणि योगिताने सांगितले की, ‘मी खूपच घाबरले आहे कारण तू तर आपल्या नात्याची घोषणा केली आहेस, मात्र मी अजूनही माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना याची कल्पना नाहीये. पण आता मला याबाबत काहीच समस्या नाहीये’
माझ्यासाठी हे सरप्राईज – योगिता
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगिता बिहानीने आपल्या आणि आर्यमनच्या नात्याबाबत खुलासा केला आणि ती म्हणाली की, ‘हो आम्ही एकमेकांना डेट करत आहोत. मला अजिबात असं वाटलं नव्हतं की ही गोष्ट इतक्या लवकर सर्वांसमोर येईल. माझ्यासाठीही हे एक सरप्राईज होतं, कारण आर्यमन आणि माझ्या योजनेत ठरल्याच्या आधीच एक दिवस आला आणि त्याने आमच्या नात्याबाबत सर्वांना सांगितले. आम्ही अजूनही सुरूवातीच्या फेजमध्येच आहोत आणि दोघेही हा काळ एन्जॉय करत आहोत’
कोण आहे योगिता बिहानी?
योगिता बिहानी ही दिल्लीची रहिवासी आहे आणि तिने संगणक शास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. ही अभिनेत्री एकता कपूरच्या ‘दिल ही तो है’ या शोमध्ये करण कुंद्रासोबत दिसली होती. तिने ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, त्याशिवाय ती अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटातही दिसली होती. सध्या ती एका नव्या प्रोजेक्टवर काम करत असून आर्यमनच्या व्लॉगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची अद्भुत कहाणी, ‘असंभव’चा फर्स्ट लूक रिलीज