भर स्टेजवर रजत दलाल असिम रियाझ गेले अंगावर धाऊन, शिखर धवनने केली मध्यस्ती; रूबिना दिलैकसमोर भिडले Video Viral
असीम रियाझ आणि रजत दलाल हे दोघेही रागीट स्वभावाचे लोकं आहेत. कोणत्याही गोष्टीचा त्यांना राग येतो. रागाच्या भरात ते काय करतील आणि काय नाही, हे सांगू शकत नाही. चाहत्यांनी त्यांचा राग बिग बॉसच्या वेगवेगळ्या सीझनमध्ये पाहिलेला आहे. बिग बॉस १८ फेम अभिनेता रजत दलाल आणि बिग बॉस १३ फेम अभिनेता असीम रियाझ सध्या एका वादामुळे चर्चेत आले आहेत. दोघांमध्येही आपआपसात जुंपली आहे. एका कार्यक्रमामध्ये दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आहे. त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये रुबिना दिलैक असीम आणि रजतच्या भांडणात अडकली असून क्रिकेटपटू शिखर धवनने त्यांच्याती वाद सोडवला आहे.
Kunal Kamra: कुणाल कामराच्या अडचणी आणखी वाढ, कॉमेडियनवर तीन गुन्हे दाखल!
दरम्यान, असीम रियाझ आणि रजत दलाल हे दोघंही ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि एम एक्स प्लेयरवरील ‘बॅटलग्राऊंड’ नावाच्या शोमध्ये आपआपसात भांडताना दिसले. व्हिडिओमध्ये दोघेही काही कारणास्तव जबरदस्त भांडताना दिसत आहे. नेमकं त्यांच्यात वाद कुठल्या कारणामुळे झाला आहे, हे समजू शकलेले नाही. अचानक काहीतरी घडतं आणि ते उठून एकमेकांसोबत भांडू लागतात. रुबिना दिलैक त्या दोघांच्याही मध्ये बसलेली आहे, ती लगेच उठते. आणि ती त्यांच्याकडे पाहतही नाही. ती फक्त सगळं ऐकत राहते. शिखर धवन त्या दोघांनाही दूर ढकलताना दिसतो. दोघेही एकमेकांना धमक्या देतात. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून ‘फिल्मीग्यान’ नावाच्या एंटरटेन्मेंट रिपोर्टरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
कोट्यवधी फसवणुकीच्या आरोपावर श्रेयस तळपदेने सोडले मौन, म्हणाला – ‘हे दुःखद आहे की…’
या पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, इतका आवाज आहे की नेमकं वादाचं कारण समजत नाहीये. पण शिखर दोघांनाही वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. तो त्या दोघांना जोरात पाठी ढकलतो, पण तरीही त्यांच्यातील वाद काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. मग शेवटी असीम रागाच्या भरात खुर्चीला ढकलतो आणि तो तिथून निघून जातो. आता प्रश्न असा आहे की, हा काही प्रँक व्हिडिओ आहे की खरोखर त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालंय का ? कारण गेल्या काही दिवसांपूर्वी रजत दलाल आणि दिग्विजय सिंह राठी यांच्यातही भांडण झाले होते. तो व्हिडिओही व्हायरल झाला. पण नंतर दोघांनीही हसत हसत व्हिडिओ बनवला आणि सांगितले की सर्व काही ठीक आहे. तो त्यांचा प्रँक व्हिडिओ होता. नेमकं आता असीम रियाझ आणि रजत दलाल यांच्यात खरोखरचा वाद झाला होता का ? की प्रँक व्हिडिओ होता ? हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.