
विशालकाय पाणगेंड्याला हरणाच्या बाळाने दिलं आव्हान, धावत पळत आला अन्... मजेदार दृश्य पाहून हसूच येईल; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये दिसून येणारे हे युद्ध एका प्राणीसंग्रहालयात घडून येते, जिथे एक महाकाय गेंडा आणि लहान हरीण आमने-सामने भिडल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये हरणाचं पिल्लू स्वत:हून गेंड्यावर हल्ला करताना दिसून येतं. गेंडा त्याच्या हल्ल्यासाठी सज्ज असतो ज्यानंतर हरणाचं पिल्लू मोठ्या जोशात त्याच्या दिशेला धाव घेतो आणि त्यांच्यात एक लहानशी टक्कर झाल्याचे आपल्याला दिसून येते. व्हिडओत गेंडा चिमुकल्या हरणाच्या पिल्लाला साथ देत त्याला घाबरल्याचे नाटक करतो. टक्कर होताच तो मागे जातो आणि असे भासवतो जणू त्याला वेदना होत आहेत. यानंतर पिल्लू दुसऱ्या दिशेला वळून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो पण गेंडा त्याची वाट अडवत त्याच्यासोबत खेळण्याची आपली इच्छा प्रकट करतो. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला हरणाचं पिल्लू फार शिताफीने गेंड्याच्या तावडीतून पळून आपल्या घरात जाताना दिसून येतो. दरम्यान हे दृश्य पोलंडमधील एका प्राणीसंग्रहालयातील असल्याचे म्हटले जाते.
Ale bestia
Nosorożec też niezły “Skąd ta brawura u samca mundżaka chińskiego?
To zew natury! Jego partnerka ma ruję, a w kawalerze buzuje testosteron. Musi wyładować energię i pokazać, kto tu rządzi – nawet jeśli sparingpartnerka waży 1,7 tony. Kto by pomyślał, że w tym małym… pic.twitter.com/xep424gCEy — donald.pl (@donald_PL_) January 8, 2026
हा व्हिडिओ @donald_PL_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा गेंडा त्या छोट्या चॅलेंजरसोबत शिंगे मारण्याचा आनंद घेत असल्याचे दिसते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शरीराने लहान पण हिमतीने तो मोठा होता” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही फार मजेदार फ फाईट होती, त्याने प्रयत्न पूर्ण केला पण गेंड्याला त्याच्या हल्ल्याने काहीच झालं नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.